ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोलांडी येथे भगवान नित्यानंद बाबा पुण्यतिथी साजरी

विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

ज्ञान गंगा नित्यानंद माऊली आश्रम सेवा संस्था व गोसेवा केंद्र कोलांडी/नंदप्पा येथे 16 जुलै ला ला तीन दिवसीय भगवान नित्यानंद बाबा पुण्यतिथी साजरी करण्यात आली, या निमित्त वृक्षा रोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला अंबुजा सिमेंट, अल्ट्राट्रेक सिमेंट,दालमिया सिमेंट येथील कर्मचारी वर्ग तसेच गडचांदुर, व परिसरातील400ते500 भाविकांची उपस्थिती होती त्यांचा सोबत उपस्थित भक्त गणाच्या माध्यमातून वृक्षा रोपण करण्यात आले तसेच गरीब व गरजू परिसरातील 100ते 125 लहान मुलांना वस्त्रदान व पेन, बॅग, पुस्तके l,व इतर शालेय साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला श्री शंकरराव देवाळकर यांनी आश्रमाबद्दल आध्यात्मिक,सामाजिक सेवा करून स्वतः आनंद घेऊन दुसऱ्यांना आनंद देता येईल यावर आपले विचार मांडले श्री सुरेश केंद्रे.आंबेझरी, श्री.मानवकर साहेब.अंबुजा सिमेंट.श्री खुशाल पा.लोण गाडगे.उपरवाही,श्री प्रशांत वाडणेरकर,अंबुजा सिमेंट,यांनी सुद्धा मार्गदर्शन केले त्यानंतर सर्वांचा हस्ते वृक्षा रोपण करण्यात आले या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आश्रमाचे सेवेकरी श्री बळीराम हेपट श्री धर्मराज पारधे श्री अनिल वडस्कर. श्री अशोक केवट श्री केशव वाघमारे श्री संतोष झाडे,श्री नंदकिशोर चिडे,श्री प्रदीप कूंभे,नरेंद्र बोरकर,श्री वसंता काळे श्री लोभनात मेंढे ,दीपक जोगी,संजय शिंदे आणि विद्यार्थी कू.कुणाल हेपट,प्रमोद शिंदे,रुपेश सोनुले, स्वपिल केवट, तन्मय चीडे,काकडे,अनुष्का पर्धे,डिंपल वडस्कर, सानिका काळे,पूर्वी काळे,आणि इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. भक्तांना महाप्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये