प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्र दे.राजा येथे दादी प्रकाश मनीजी यांचा स्मृतिदिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा अशोक डोईफोडे
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरिय विश्वविद्यालय राजस्थान माउंट आबू या जागतिक कीर्तीच्या संस्थेच्या प्रथम प्रशासिका राजयोगिनी तपस्विनी अव्यक्त वतनवाशी दादी प्रकाशमनीजी यांच्या 26 व्या स्मृती दिनानिमित्त आणि बऱ्हाणपूर झोनच्या तत्कालीन संचालिका अव्यक्त वतन वाशी सुधा दीदीजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त देऊळगाव राजा येथील ब्रह्मकुमारी केंद्रावर कार्यक्रमाचे आयोजन दिं. 26 ऑगस्ट रोजी करण्यात आले होते.
ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन मनीष काबरा सौ.राखी काबरा तसेच पत्रकार प्रा अशोक डोईफोडे सर यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी ब्रह्मकुमारी केंद्राच्या संचालिका बी.के. सुनंदा दीदीजी यांनी दादी प्रकाशमनीजी आणि सुधा दीदीजी यांचे अनुभव उपस्थितांसमोर कथन केलेत. यावेळी पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. लता राजपूत यांनी केले तर आभार प्रदर्शन बी.के. देवकाला दीदी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री प्रल्हाद ढोरे, सुभाष ढाकणे ,ओंकारसिंग राजपूत इ. साधकांनी परिश्रम घेतलेत. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थिततांसाठी ब्रह्मा भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.



