ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंदखेडराजा तहसील कर्मचाऱ्यांचा १ सप्टेंबरपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलनाचा इशारा

देऊळगाव राजा येथील घटनेतील आरोपींवर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा महसूल कर्मचाऱ्यांचा निर्णय; तहसीलदारांना दिले निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथील तहसीलदार यांच्यावर अवैध गौणखनिज वाहतूक प्रतिबंधक पथकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ महसूल कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे. देऊळगाव राजा तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २४ ऑगस्ट २०२६ पासून पुकारलेल्या संपास पाठिंबा देण्यासाठी आणि आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सिंदखेडराजा तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १ सप्टेंबर २०२६ पासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, देऊळगाव राजा तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी २४ ऑगस्टपासून सामूहिक रजेवर आहेत. आरोपींवर ठोस कारवाई न झाल्यामुळे हे आंदोलन सुरू आहे. सिंदखेडराजा येथील महसूल कर्मचाऱ्यांनी २७ ऑगस्ट रोजी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. मात्र, २९ ऑगस्ट रोजी जिल्हा अध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना बुलढाणा यांनी दिलेल्या आदेशानुसार सिंदखेडराजा येथील कर्मचाऱ्यांनी आपला संप तात्पुरता मागे घेतला होता.

त्यानंतर ३१ ऑगस्ट २०२६ रोजी मा. जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्यासोबत झालेल्या चर्चेत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर कोणताही समाधानकारक तोडगा न निघाल्याने आणि मागण्या मान्य न झाल्याने आता सिंदखेडराजा तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १ सप्टेंबर २०२६ पासून पुन्हा ‘बेमुदत सामूहिक रजा’ आंदोलनात सहभागी होण्याचा ठाम निर्णय घेतला आहे.

या संदर्भातील मागणीचे रीतसर निवेदन सिंदखेडराजाचे तहसीलदार अजित दिवटे यांना सादर करण्यात आले.

निवेदनावर खालील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत:

विवेक जगताप (महसूल उपविभागीय अध्यक्ष), डॉ. प्रविण वराडे (नायब तहसीलदार), एस. डी. बंगाळे (निवासी नायब तहसीलदार), एस. आर. फाले (निरीक्षण अधिकारी), एस. बी. रोकडे (नायब तहसीलदार), आर. एस. सौर (सहाय्यक महसूल अधिकारी), आर. आर. कहाळे (सहाय्यक महसूल अधिकारी), जे. के. नागरे (सहाय्यक महसूल अधिकारी), एन. एम. खरात (सहाय्यक महसूल अधिकारी), के. डी. इंगोले (महसूल सहाय्यक), एल. डी. शिंगणे (महसूल सहाय्यक), जे. एन. शिपे (महसूल सहाय्यक), मनोहर चेके (महसूल सहाय्यक), एस. एस. सोनुने (महसूल सहाय्यक), डी. एन. बनकर (शिपाई), अनंता वाटारे (शिपाई), एस. डी. अंभोरे (शिपाई), शिवाजी शिंदे (शिपाई), संजय आटोळे (अध्यक्ष, महसूल सेवक), राजू खरात (महसूल सेवक) आदी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

कर्मचाऱ्यांच्या या सामूहिक रजा आंदोलनामुळे तहसील कार्यालयातील प्रशासकीय कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये