चंद्रपूर येथे अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने विद्यार्थी सत्कार सोहळा
एक दिवसीय ARTI तर्फे मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह चंद्रपूर येथे 27 ऑगस्ट रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील मांग मातंग मादगी व तत्सम जातींनी एकत्र येऊन साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती ARTI च्या सहयोगाने साजरी करण्यात आली
जयंती निमित्य ARTI (लोकशाहीर आण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था मुंबई व चंद्रपूर जिल्ह्यातील समाजबांधव कर्मचारी समाजसेवक यांच्या सहकार्याने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती मोठा उत्साहात प्रथमच एवढ्या मोठ्या स्तरावर भव्य दिव्य साजरी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वप्निल भालेराव यांनी तर सूत्रसंचालन डॉ.धनंजय भिसे यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक दिलीप चौधरी सरांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले. तदनंतर डॉ. कुलभूषण मोरे समन्वयक आर टी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील शैक्षणिक परिस्थिती तथा आर्टी योजनाचा कसा उपयोग विद्यार्थ्यांनी केला पाहिजे यावर मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण व संशोधन केंद्र मुंबईच्या वतीने या संस्थेचे महासंचालक तथा प्रमुख मार्गदर्शक श्री सुनील वारे IRAS सर उपस्थित होते त्यांनी या कार्यक्रमाला विद्यार्थ्याला व समाजातील व्यक्तींना आर टी तर्फे देण्यात येणाऱ्या विविध योजना यांची माहिती दिली इयत्ता दहावी पासून तर पी एच डी करेपर्यंत आणि विविध कौशल्य वर आधारित रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रम हा दोन सत्रांमध्ये घेण्यात आला प्रथम सत्र लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा कार्यक्रम विद्यार्थ्यांचा सत्कार व कर्मचाऱ्यांचा सत्कार घेण्यात आला त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये विशेष म्हणजे मातंग मादगी व इतर तत्सम जातीतील विद्यार्थ्यांचे प्रश्नांची उत्तरे त्यांनी अगदी सविस्तरपणे दिले डॉ.कुलभूषण मोरे, प्रा प्रकाश बोरकर सर, ॲड राम मेंढे, नारायण ढगे,श्री प्रशांत डोंगरे श्री राजु भाऊ येले श्री वामन आमटे, लहुकांत काकडे चंद्रकांत घोडके व समाजातील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांनी या कार्यक्रमाला योग्य स्वरूप देऊन कार्यक्रमाला अतिशय व्यवस्थितपणे विद्यार्थ्यांपर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचविले
आर्टीचे PRO श्री स्वप्निल भालेराव यांनी सुद्धा या कार्यक्रमाचे आखणी व नियोजन श्री सुनील वारे सर यांच्या मार्गदर्शनात अतिशय सुंदर पद्धतीने करून चंद्रपूरकरांना साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यासाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली अण्णाभाऊंनी केलेल्या कार्याचे मार्गदर्शन व त्यांच्या साहित्य बद्दल माहिती देण्यात आली व आर टी या इन्स्टिट्यूट तर्फे विद्यार्थी युवक युवती यांना अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून मोलाचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पुस्तिका पुरविण्यात आले.
या जयंतीच्या कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च हा महाराष्ट्र शासनातर्फे आर टी च्या मार्फत करण्यात आला त्यामध्ये सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत विविध उपक्रम घेण्यात आले आणि चहा नाश्ता जेवणाचे सुद्धा सुविधा करण्यात आली होती.
नियोजन समिती व आर टी च्या माध्यमातून या कार्यक्रमाला व्यवस्थित पार पाडण्यात सर्व समाज बांधव विद्यार्थी व कृतींचा सहभाग लाभला यापुढेही असे उपक्रम आर टी तर्फे घेण्यात येण्याचे महासंचालक श्री सुनील वारे सर यांनी सुचविले. असे अनेक कार्यक्रम चंद्रपूर जिल्ह्यात घेण्याचे प्रतिपादन डॉ. कुलभूषण मोरे समन्वयक आर्टी यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. प्रकाश बोरकर सरांनी केले. कार्यक्रमात जिल्ह्यातील चंद्रपूर शहर तथा अतिदुर्गम जिवती कोरपणा भद्रावती वरोरा राजुरा वणि गुडसेला मोहदा कुंबेजरी पाटण अशा विविध तालुक्या गावातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होता.



