मेजर ध्यानचंद हे आपल्या राष्ट्राचा अभिमान : अशोक भैया
राष्ट्रीय क्रीडा दिन : १०५ कलर होल्डर खेळाडूंचा सत्कार,ब्लेजर प्रदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :-हाॅकीचे जादूगार मेजर ध्यानचंद हे राष्ट्रीय खेळाडू होते.त्यांनी रात्रंदिन एक करुन संपूर्ण लक्ष केंद्रित करीत हाॅकी खेळात प्राविण्य मिळवले.त्यांनी सतत देशासाठी खेळून देशाला अनेक सन्मान मिळवून दिले.त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपणही क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी.हे मेजर ध्यानंद राष्ट्राचा अभिमान आहेत.” असे विचार नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैया यांनी मांडले. ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिन ‘ कार्यक्रमात उद् घाटक म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ सुभाष शेकोकर,मेजर प्रा. विनोद नरड,समिती प्रभारी प्रा आकाश मेश्राम, डॉ.के.एम. शर्मा, प्रा.आनंद भोयर उपस्थित होते.याप्रसंगी राज्यस्तरीय,राष्ट्रस्तरीय खेळात प्रतिनिधित्व करणा-या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.७० विद्यार्थ्यांना कलर होल्डरला ब्लेजर तर १०५ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.महाविद्यालयातर्फे दरवर्षी उत्कृष्ट खेळाडूंना अशोक भैयाजींतर्फे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.इथे३२ खेळ खेळले जात असून अनेक विद्यार्थी आतंरराष्ट्रीय स्तरावर चमले आहेत.असे अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ शेकोकरांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन डॉ के.एम.शर्मा तर आभार प्रा जयेश हजारेंनी मानले. कार्यक्रमाला खेळाडूंनी गर्दी केली होती.यशस्वीतेसाठी समिती सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.



