ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ज्येष्ठ पत्रकार नितीन पुद्दटवार यांना पितृशोक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी येथील ज्येष्ठ पत्रकार तथा एलआयसी अभिकर्ते नितीन पुद्दटवार यांचे वडील केशवराव पांडुरंग पुद्दटवार यांचे आज, सोमवार दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे ३.१५ वाजता दुःखद निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.

केशवराव पुद्दटवार हे प्रेमळ, मनमिळावू व धार्मिक वृत्तीचे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच पुद्दटवार कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच गोंडपिपरी परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, जावई, नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार नितीन पुद्दटवार यांच्या कुटुंबावर या दुःखद प्रसंगामुळे शोककळा पसरली आहे.

केशवराव पुद्दटवार यांच्या पार्थिवावर आजच दुपारी गोंडपिपरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने पुद्दटवार कुटुंबीयांनी एक आधारवड गमावला असून, त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये