निमणी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी देवेंद्र ढवस यांची बिनविरोध निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना तालुक्यातील निमणी येथे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदाची निवड बिनविरोध पार पडली. यामध्ये देवेंद्र ढवस यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे गावातील सामाजिक एकोपा आणि सलोखा अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
गावातील नागरिकांमध्ये निर्माण होणारे छोटे-मोठे वाद गावपातळीवरच सामोपचाराने सोडविणे, नागरिकांमध्ये परस्पर समन्वय निर्माण करणे आणि गावात शांततेचे वातावरण कायम राखणे, ही तंटामुक्त समितीची महत्त्वाची भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र ढवस यांच्यावर समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
यावेळी सरपंच अतुल धोटे उपसरपंच शिल्पा जगताप उमेश राजुरकर विलास कोंगरे गजानन गोबाडे प्रफुल काळे संजय राळे बबन पिदुरकर निलेश महाकुलकर श्यामराव दोरखंडे स्वप्नील धोटे प्रणय पिंपळशेंडे जनार्धन प्रफुल गोरे साहिल टोंगे प्रफुल मोरे आदी उपस्थित होते.
बिनविरोध निवड ही गावकऱ्यांचा विश्वास आणि एकजुटीचे प्रतीक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर देवेंद्र ढवस यांनी गावातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. गावातील तंटे वाढण्याऐवजी संवादातून प्रश्न सोडविण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, देवेंद्र ढवस यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ग्रामस्थ, मित्रपरिवार व विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
निमणी गावात शांतता, सलोखा आणि बंधुभाव कायम ठेवण्यासाठी नव्या समितीच्या माध्यमातून सकारात्मक उपक्रम राबविले जातील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली



