आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयात युवती स्वरक्षणाचे प्रशिक्षण संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर येथील महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयात दिनांक १३ जुलै राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक मा. रवींद्र शिंदे होते. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे निर्देशक डॉ. अनिस खान यांनी केले.

प्राचीन काळापासूनआपल्या समाजामध्ये स्त्रियांकडे उपभोगाची वस्तू म्हणून बघितले जाते. स्त्री हि अबला आहे अशी समाज समाजाची होती. मात्र आज त्यात थोडेफार बदल झालेले आपल्याला दिसते. त्यामागे कारण असे कि कित्येक महानायिकांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी केलेले कार्य होय. परिणामी आज स्त्रिया, मुली स्वतंत्रपणे निर्णय घेण्यास सक्षम झालेल्या आहेत असे दिसते. असे असले तरी स्त्रियांच्या खूप समस्याआहेत. अलीकडच्या परिस्थितीकडे बघितल्यास असे दिसते कि स्त्री कुठेच सुरक्षित नाही. घरी, सार्वजनिक ठिकाणी तिच्यावर वेगवेगळ्या स्वरूपातला अत्याचार होताना दिसतो. हा छळ थांबवायचा कसा हा यक्ष प्रश्न आहे. या साठी शासन निरनिराळी पाऊले उचलीत असतात.

हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन महाविद्यालयाच्या ठिकाणी राजमाता जिजाऊ स्वसंरक्षण प्रशिक्षणचा कार्यक्रम आयोजित केला. स्वतःचे स्वरक्षण करण्यासाठी काही पाऊले शासन उचलीत असतात, त्यात पोलीस या नात्याने पोलीस विभागात स्त्री पोलिसांची नेमणूक करणे, कामाच्या ठिकाणी होणारे अत्याचार थांबवण्यासाठी विशेष अधिकार देणे, ११२ हा ऑनलाईन पोलीस क्रमांक देणे, कायद्याचे ज्ञान प्रदान करणे, जागृती निर्माण करणे, वडीलधाऱ्या माणसांच्या आज्ञा पाळणे तसेच वयक्तिक पातळीवर स्रियांनी सुद्धा काही गोष्टीचे पालन करणे आवश्यक आहे त्यात स्त्रियांनी किंवा मुलींनी कुणाही नवीन व्यक्तीबरोबर चॅटिंग करणे टाळावे, मोठ्या व्यक्तीचा विश्वास संपादन करणे, स्वरक्षणाचे धडे संपादन करणे इत्यादी बाबीसंबंधी मार्गदर्शन पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी केले.

आजचा काळ झपाट्याने बदलत आहे, स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात आज मागे नाही, उलट माणसाचा सर्वात मोठा गुरु हि आई आहे. आई हि आपल्याला सकाळी उठवते, जेवण बनवते, टिफिन देते, शाळेत नेते, आपला अभ्यास घेते, आपल्यावर संस्कार करते, आपल्या मुलामुलींना माणूस म्हणून घडवते. इतके मोठे कार्य चांगला समाज घडवण्यासाठी एक स्त्री आई म्हणून करते. त्यामुळे स्त्री हि सक्षम आहे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देव यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविदयालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाहरी व मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी उपस्थित होत्या. महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. मनोहर बांद्रे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तसेच सर्व पाहुण्यांचे, अध्यक्षाचे व विद्यार्थ्यांचे आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये