विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेतर्फे प्रधानमंत्री सुरक्षा विम्याचा लाभाचे मयताच्या वारसांना दोन लाखाचा धनादेश वितरण
प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजना १२ रु. वरून २० रु. तर जीवन ज्योती वीमा योजना ३३० रु. वरून ४३६ रु. वर नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना आरोग्य उपचारासाठी अनेक योजना अमलात आणल्या असून त्यात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, जीवन ज्योती विमा, अटल पेन्शन योजना दिल्या असून ब्रम्हपुरी तालुक्यातील चीचगाव येथील मुर्लीधर जैराम खरकाटे यांनी सुरक्षा विमा विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा गांगलवाडी येथे काढला होता.
त्यांचा अपघात ८ महिन्यापूर्वी झाला असतां त्यांना सावंगी मेघे रूग्णालय वर्धा येथे उपाचाराकरिता दाखल करण्यात आले होते माञ त्यांचा उपचार करतांना त्यांची जीवनज्योत मावळली.
मुर्लीधर जैराम खरकाटे या इसमाने प्रधानमंत्री सुरक्षा विमा काढला असता त्यांचा मृत्यू झाल्याने वारसान असलेल्या शेवंता मुर्लीधर खरकाटे यांना दोन लाख रूपये चा विमा लाभाच धनादेश मिळाला असून विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा गांगलवाडी शाखा व्यवस्थापक श्री. अक्षय भैसारे साहेब, श्री.रुदल मस्के साहेब यांचे हस्ते धनादेश सुपूर्द करण्यात आला.
प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजना हि १२ रुपयावरून २० रु झाली तसेच जीवन ज्योती वीमा योजना ३३० वरून ४३६ पॉलिसी असून नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री.अक्षय भैसारे शाखा व्यवस्थापक विदर्भ कोकण ग्रामीण बँक गांगलवाडी यांनी केले आहे.