चालकाला झोपेची डुलकी आल्याने समोर चालत असलेल्या. वाहनाला मागून धडक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
अपघात दिनांक व वेळ* :- 01/02/2026 चे 06/20 वा. सुमारास अपघातातील वाहन :- 1. कार क्रमांक:- MH-05-AX-7612 2. कंटेनर क्रमांक :-MH-46-CL-1556
अपघाताचे कारण:- यातील कार क्र. MH-05-AX-7612 च्या चालकाला झोपेची डुलकी आल्याने मिडल लेनवर समोर चालत असलेल्या कंटेनर क्र.MH-46-CL-1556 ला पाठीमागून जोराची धडक दिल्याने अपघात झाला.
आम्ही पो.उप.नि. दिलीप थाटे व पो.उप. नि. प्रकाश चौधरी समृद्धी महामार्ग येथे नागपूर कॉरिडोर चॅनेज क्रमांक 39/900 येथे सी आर ओ छत्रपती संभाजी नगर यांनी दिलेल्या अपघात झाल्याच्या माहितीवरून महामार्ग पोलीस स्टाफ HC/1398, 1418,PC/1079 MSF स्टाफ,QRV स्टाफ Ambulance स्टाफ असे घटनास्थळावर त्वरित रवाना होऊन मोक्यावर हजर झालो.
सदर अपघाताची हकीकत अशाप्रकारे आहे की, यातील कार क्र. MH-05-AX-7612
चा चालक नामे-1) विवेकानंद हनुमंत कणबर्गी वय 56 वर्ष( मृतक) व सोबत त्यांची आई 2) आशालता हनुमंत कणबर्गी वय 84 वर्ष ( मृतक ) दोन्ही राहणार हल्ली मुक्काम रामनगर नागपूर हे आपल्या कार ने ठाणे ते नागपूर रोडचे मिडल लेनने जात असता चॅनेज क्रमांक 39/900 नागपूर कॉरिडोर येथे आल्यावर यातील कार चालकाला झोपेची डुलकी आल्याने मिडल लेनवर समोर चालत असलेल्या कंटेनर क्रमांक MH-46-CL-1556 ला पाठीमागून जोराची जबर धडक दिली,
सदर अपघातामध्ये कार मधील 1) आशालता हनुमंत कणबर्गी वय 84 वर्ष ह्या जागीच मरण पावल्या असून कारचा चालक 2) विवेकानंद हनुमंत कणबर्गी वय 56 वर्ष यांच्या डोक्याला, हाता पायाला गंभीर दुखापत झाली असल्याने त्याला कारचे बाहेर काढून जखमी अवस्थेत ॲम्बुलन्सचे साह्याने सावंगी रुग्णालय येथे उपचाराकरिता नेत असताना वाटेतच मरण पावला . अपघातग्रस्त वाहन क्रेन च्या सहाय्याने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे, महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे शांतता आहे.
सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशन सेलू येथे कळविण्यात आले असून तेथील पोलीस स्टॉप घटनास्थळी हजर कार्यवाही सुरू आहे.



