ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ऑपरेशन मुस्कान 14 अंतर्गत देवळी पोलीस स्टेशन येथे दमदार कामगीरी

आई वडील यांचे चेहऱ्यावर फुलले हास्य

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दि.31/01/2025 रोजी पोलीस स्टेशन देवळी हदिदतील मौजा सरूळ गावातील मुलगी घरून रात्र दरम्याण निघुन गेल्याची माहीती पोलीस स्टेशनला 11.00 वा. दरम्याण प्राप्त झाली. प्रभारी ठाणेदार स. पो.नी संदीप कापडे यांनी सदर प्रकरणाची गांभीर्य ओळखुन पो.उप. नी. शिवराज जाधव यांना तत्काळ मुलीचा शोध घेणे कामी रवाना केले व नातेवाईकांची तक्रार नोंदविण्यास सुरवात केली. त्याच दरम्याण पो.उप.नि. जाधव व त्यांचे पथकांनी मिसींग मुलीबाबत घटनास्थळावरून व तांत्रीक बाबींचा व सि.सि.टी. व्हीचा अंत्यत कसोशीने व बारकाईने तपास करून दोन तासाचे आत मुलीचा शोध घेतला व मुलीला सुखरूप पोलीस स्टेशनला घेवुन आले. मिसींग मुलीला घरून का निघुन गेली या बाबत सवीस्तर विचारपुस करण्यात आली. ती अभ्यासाचे कारणाने निघुन गेल्याबददल सांगत होती तरी त्या बाबत जिल्हा व बालकल्याण अधिकारी यांचेशी सवीस्तर चर्चा करून मिसींग मुलीस तिच्या आई-वडीलाचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. सदाशिव वाघमारे सा. तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कास्खेले मॅडम, पुलगाव यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी ठाणेदार श्री. संदीप कापडे यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनी शिवराज जाधव व पथकातील ग्रे. पनोउप.नि. निमजे, पो.शी. पंकज चामचोर, म.पो.शी. प्रियंका तायवाडे चालक पो.शी. फिरोज पठाण सर्व नेमणुक देवळी यांनी केली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये