पोलीस स्टेशन मध्ये तक्रार न देता बाहेर येऊन खोटी गवाई. महिला ठाणेदारा कडून वस्तू तिथी स्पष्ट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपणा : पोलीस ठाण्यात २३ सप्टेंबर रोजी घडलेल्या एका प्रकरणाबाबत तक्रारदार महिला व पोलिस प्रशासनाच्या भूमिकेबाबत परस्परविरोधी दावे समोर आले आहेत. या प्रकरणात संबंधित महिलेने पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचा आरोप केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पोलिसांकडील म्हणण्यानुसार संबंधित महिलेला तक्रार देण्यास सांगण्यात आले होते; परंतु तिने तक्रार देण्यास नकार दिल्याचे सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता शालिनी सुनील जाधव (वय ३४), रा. धानोली तांडा, ता. कोरपणा, जि. चंद्रपूर या कोरपणा पोलीस ठाण्यात आल्याचे संबंधित संदेशामध्ये नमूद आहे. यावेळी त्यांची पोलिसांनी विचारपूस केली. महिलेने स्वतःच्या घरातून सोने, पैसे, भांडी व कपडे पोलिसांनी काढून द्यावेत, अशी मागणी केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांकडून, नवऱ्याविरुद्ध तक्रार असल्यास लेखी तक्रार द्यावी आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आल्याचा दावा आहे. मात्र, संबंधित महिलेने तक्रार देण्यास नकार देत पोलीस ठाण्यातून निघून गेल्याचे पोलिसांच्या म्हणण्यातून समोर येते.
दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांकडे स्टेशन डायरीमध्ये नोंद तसेच सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष घटनेची सत्यता सीसीटीव्ही फुटेज, स्टेशन डायरीतील नोंदी आणि संबंधित व्यक्तींच्या जबाबातून स्पष्ट होऊ शकते.
याप्रकरणी नंतर संबंधित महिलेकडून “पोलीस ठाण्यात माझी तक्रार घेण्यात आली नाही” असा दावा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नेमकी तक्रार देण्यात आली होती का, तक्रार स्वीकारण्यास नकार देण्यात आला का, की संबंधित महिलेने तक्रार न देता पोलीस ठाणे सोडले, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींनी सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमातून कोणतेही आरोप करण्यापूर्वी उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज, पोलीस स्टेशन डायरीतील नोंदी आणि अधिकृत तक्रारीची माहिती तपासूनच बातमी प्रसारित करावी, असे आवाहन कोरपना पोलीस स्टेशन चे ठाणेदार लता वाडिले यांच्या वतीने करण्यात आले आहे.



