ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा इको फाउंडेशन व चिंतामणी गणेश मंडळ तर्फे स्वच्छता अभियान

चांदा ब्लास्ट

चांदा इको केअर फाउंडेशन व जे. बी. चिंतामणी गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने  दिनांक 27 सप्टेंबर ला रामसेतू व इरई नदी पात्रात जागतिक नदी स्वच्छता दिनानिमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

गणपती विसर्जना दरम्यान झालेल्या कचऱ्या मुळे नदी प्रदूषण होऊ नये व परिसर स्वच्छ राहावा या भावनेने इरई नदी परिसरात हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी चांदा ईको केअर फाउंडेशनचे अध्यक्ष विवेक आंबेकर यांनी प्रशासनाला विनंती केली की प्रशासनाने वेळोवेळी शहरातील नदी ,नाले व रस्त्यावरील कचऱ्याची सफाई नियमित करावी व जनतेचे आरोग्य जपावे.

याप्रसंगी चांदा ईको केअर फाउंडेशनचे अध्यक्ष विवेक आंबेकर, सचिव पद्माकर मोरे, उपाध्यक्ष अशोक दुर्गे, कोषाध्यक्ष प्रमोद केळझरकर, संजय रागणकर, आनंद निरंजने, नितीन फुलझले, सतीश पेठे, प्रदीप देवईकर, अविनाश रेशीमवाले, अतुल अल्याडवार,अतुल देवतळे व जे बी चिंतामणी गणेश मंडळचे पदाधिकारी भारत जुमडे व सदस्य उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये