मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
विघ्नहर्ता गणेश मंडळ, हनुमान चौक पोंभुर्णा आणि नगरपंचायत पोंभुर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून अनेकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
यावेळी मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त पुढील धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचीही माहिती देण्यात आली. शनिवार, दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी श्री गणेश विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन विघ्नहर्ता गणेश मंडळाने केले आहे.
गणेशोत्सव सामाजिक ऐक्य, सेवा आणि भक्तिभावाने साजरा करण्याचा मंडळाचा प्रयत्न असून समस्त नागरिकांनी या कार्यक्रमांचा आनंद व आस्वाद घ्यावा, अशी अपेक्षा मंडळाने व्यक्त केली आहे.



