राज्यात दुष्काळाची दहाकता पीडबल्यूडीत मात्र राजभोजन
सा.बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता काळेचा प्रताप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा : एकीकडे दुष्काळाची दाहकता बुलढाणा जिल्ह्यात तीव्र असताना राज्याचे उपमुख्यमंत्री व आमदार बुलढाणा मतदार संघाच्या दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बळीराजाच्या संवेदना ऐकून घेत असताना भंडाऱ्याच्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी जिल्हाभरातील प्रतिष्ठितांसाठी राजभोजना चे आयोजन केल्याचा असंवेदनशील प्रकार समोर आला आहे. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत शेतकऱ्यांप्रती प्रत्येक अधिकाऱ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी अत्यंत संवेदनशील पणाने वागणे अपेक्षित असताना बुलढाणा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घडलेला हा प्रताप जिल्हाभर चर्चेचा विषय ठरला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा येथील कार्यकारी अभियंता जितेंद्र काळे यांनी पहिल्यांदाच शासकीय कार्यालयाच्या परिसरात गणेश मंडळाची स्थापना केली, एकीकडे बुलढाणा येथील सर्व गणेश मंडळांनी श्री गणेशाचे विसर्जन अत्यंत साधेपणाने करण्याचा सामूहिक निर्णय घेतला असताना सार्वजनिक बांधकाम विभाग बुलढाणा येथील कार्यकारी अभियंता यांनी विनित म्हणून स्वतःचे नाव टाकून पत्रिका छापल्या, एवढेच नव्हे तर राजेशाही मंडप उभारून भंडाऱ्याच्या नावाखाली जिल्ह्यातील प्रतिष्ठितांसाठी राज भोजनाचे आयोजन केले. दुष्काळाच्या गर्गेत अडकलेल्या बुलढाण्यात बांधकाम विभागाच्या जिल्हा कार्यालयातर्फे प्रतिष्ठितांसाठी राजेशाही जेवणावड्या वाढल्याने दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बळीराजा प्रति आपण किती संवेदनशील आहोत याचाच प्रत्यय बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता दिला आहे. राजशाही मंडप उभारलेल्या या समारंभासाठी अकोला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता थोटांगे यांनी सुद्धा
स्वतः सहकुटुंब हजेरी लावली
वास्तविक पाहता दुष्काळाची दाहकता पाहता त्यांनी सदर राजेशाही कार्यक्रम रद्द करण्याचे निर्देश आपल्या अधिकाऱ्याला द्यायला हवे होते मात्र त्यांनी स्वतः या कार्यक्रमात सह कुटुंब हजर राहून एक प्रकारे असंविधानशीलतेचा परिचय दिला.
एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व बुलढाण्याचे आमदार धर्मवीर संजय गायकवाड दुष्काळी परिस्थिती चा आढावा घेण्यासाठी शेतकऱ्यांचा बांधावर होते,तर दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी राजशाही थाटात सहकुटुंब जिल्ह्यातील प्रमुख प्रतिष्ठितांच्या समवेत जेवणाचा आस्वाद घेत होते. शेतकऱ्यांप्रती असावेदनशीलता दर्शविणाऱ्या या कार्यक्रमाबाबत एका अग्रगण्य मराठी वृत्तवाहिणी ने वृत्त प्रकाशित करून आधुनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांचा प्रताप जनतेसमोर आणायला. सर याबाबत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले,
दुष्काळाच्या काळात अधिकाऱ्यांनी संवेदनशील वागणे आवश्यक आहे, राज्यभरातील शेतकरी भयावाह दुष्काळी परिस्थिती मुळे मरणाच्या दारावर असताना गावगाड्यातील शेतकऱ्यांना प्रति अधिकाऱ्यांनी अतिशय शेतकऱ्याप्रती संवेदना जागृत ठेवायला हव्या, बांधकाम विभागाचे अधिकारी शेतकऱ्याप्रती अतिशय असंवेदनशील पणे वाढले आहेत, शेतकऱ्याना आधार देण्याऐवजी असे मस्तवाल पणे वागणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकविला जाईल असा निर्वाणीचा इशारा ही शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी यावेळी दिला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री दुष्काळी परिस्थिती पाहण्यासाठी बांधावर असताना अतिशय राजेशाही थाटात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रतिष्ठितांसाठी जेवणावड्या वाढल्याचा निषेध शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी प्रकल्पाने नोंदविला असताना इतर राजकीय पक्षाचे नेते या गैरप्रकाराचा निषेध नोंदवतील का की मूग गिळून चूप राहतील याकडे जनतेचे लक्ष लागले आहे



