ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तरुणीचा दीड लाखात मध्य प्रदेशात लावून दिला विवाह

देवदर्शनाला नेले होते : चार जणांवर गुन्हे दाखल : सर्व आरोपी फरार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           देवदर्शनाच्या नावाखाली १८ वर्षीय तरुणीला मध्य प्रदेशात नेऊन चक्क दीड लाख रुपयांत तिची विक्री करत जबरदस्तीने विवाह लावून दिल्याची धक्कादायक घटना ३१ जानेवारी रोजी उघडकीस आली. या प्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी विभा ऊर्फ पिऊ प्रतीक धोटे, विक्की लारोकर, लक्की प्रतीक धोटे व विभा धोटेची आई यांच्यावर कलम १४३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दुर्गापूर येथील पीडित तरुणी ऊर्जानगरातील कॅटर्सच्या कामावर जात होती. २९ डिसेंबर २०२५ रोजी घरात वाद झाल्याने ती भद्रावती येथील मैत्रिणीकडे गेली. तिथे घराशेजाऱ्याच्या विभा ऊर्फ पिऊ प्रतीक धोटे हिच्याकडे घरकाम करू लागली. ३१ डिसेंबर २०२५ रोजी विभा धोटे हिने स्वतःची आई, मुलगा लक्की व विक्की लारोकर यांच्यासह कुबेश्वर धाम भावाला संपर्क केल्याने झाली सुटका

पीडितेने संधी साधून लपून भावाशी संपर्क साधत आपबीती सांगितली. भावाने २० जानेवारी रोजी दुर्गापूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. ठाणेदार संदीप एकाडे व पथकाने मध्य प्रदेश गाठून तरुणीची सुटका करून परत आणले. पुढील तपासासाठी प्रकरण भद्रावती पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

येथे देवदर्शनाला जाण्याचे कारण सांगून पीडित तरुणी व तिच्या मैत्रिणीला सोबत नेले. १ जानेवारी २०२६ रोजी तेथे तीन दिवस लॉजवर थांबले. दि. ४ जानेवारीला धोटे यांच्या ओळखीचे पाच ते सहाजण तेथे आले.

पीडिताचा फोटो काढून ते निघून गेले. नंतर पीडितेला मध्य प्रदेशातील मुगलखेडी, राजगढ येथे भगवानसिंह गोपीलालसिंह मोंगीया यांच्या घरी नेऊन तिची दीड लाख रुपयांत विक्री केली. तसेच स्टॅम्प पेपरवर करारनामा लिहून जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले.

पंच म्हणून सोदानसिंह नारायणसिंह, लक्ष्मीनारायण अमरसिंह मोंगीया व दिनेशसर भवरलालजी मोंगीया होते. भगवानसिंहच्या मामाच्या मुलीने विभा धोटेने दीड लाख रुपयात तुझे लग्न लावून दिल्याचे सांगताच ही गोंधळली. त्यानंतर पीडितेने भावाशी बोलण्याची विनंती केली असता, दीड लाख रुपये दिल्याशिवाय परत जाऊ देणार नाही, अशी धमकी देण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये