सडक सुरक्षा जीवन रक्षा अभियान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 31/01/2026 रोजी दरम्यान सडक सुरक्षा जीवन रक्षा अभियान 2026 समारोपीय/ सांगता कार्यक्रमाचे आयोजन मपोकेंद्र जाम येथे करण्यात आले सदर कार्यकमास अध्यक्ष म्हणुन डॉ. श्री अनंत दुबे भारतीय रेसकॉस सोसायती भारत भ्रमण सायकल यात्रा रा.नरसिंहपुर मध्यप्रदेश प्रमुख पाहुणे म्हणुन प्राध्यापक श्री अनिल चौधरी ITI कॉलेज समुद्रपूर व इतर पाहुणे प्रा.श्री सतिष वरके, श्री देवेद दुबे,श्री विलास भोयर NHAI रोड सेप्टी इंचार्ज, प्रा श्री नितिन वाघमारे प्रा श्री विवेक दुबे प्रा.श्री शुभम बालपांडे सर्व शासकीय ITI समुद्रपूर डॉ उत्कर्ष वाघमारे हायवे अॅम्बुलंस सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले
सदर कार्यक्रमातील उपस्थित सागर ज्ञानपिठ कॉन्वेंट जाम चे विद्यार्थी,ITI चे प्रशिक्षणार्थी ग्रामपंचायत सदस्य, इतर नागरिक तसेच चालक यांना वाहतुक नियमाचे संबधाने मान्यवरांनी मार्गदर्शन केले तसेच आपतकालीन स्थितित हदयरोग,मिरगी, अपघातात फॅक्चर झाल्यास काय करावे याबाबत डॉ उत्कर्ष वाघमारे यांनी CPR चे डेमो दाखवून इत्तर विषयी मार्गदर्शन केले तसेच आम्ही दिलिप थाटे प्रभारी अधिकारी नी उपस्थित लोकांना वाहतुकीचे नियमा बाबत तसेच समुद्धी महामार्ग अपघात घडल्यास टोल फ्री क्र 8181818155, तसाच राष्ट्रीय महामार्गवर अपघात घडल्यास टोल फ्री क्र 1033, पोलीस मदत डॉयल क्र 112, व अम्बुलस क्र108 यावर माहिती देण्यात यावी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच Psi तोडासे यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्याचे आभार मानुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



