ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गहाळ झालेल्या 13 मोबाईलचा सेलू पोलीसांनी लावला शोध

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन सेलू हद्दीतील गहाळ झालेल्या मोबाईल बाबत प्राप्त तक्रारीचा पाठपुरावा करुन सेलू पोलीसांना जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 मध्ये हरवलेल्या 13 मोबाईलचा शोध लावण्यात यश आले असून 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तक्रारदार 1)मनोज भांडेकर रा. वडगाव खुर्द, यांचा Oppo कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे 15,000 रु. 2) कैलास मांढरे रा.वॉर्ड न 4 सेलू,यांचा Oppo कंपनीचा मोबाईल किंमत अंदाजे 16000 रु.तसेच गहाळ झालेले इतर 11 मोबाईल सेलू पोलीसांनी तक्रारदार यांना परत देण्यात आलेले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, मा, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात ठाणेदार देवेंद्र ठाकूर, पोलीस अंमलदार ज्ञानदेव वनवे, पो.स्टे. सेलू , यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये