ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक, वर्धा यांची अवैध दारु विक्रेते यांचे विरुध्द बेधडक मोहीम

पोलीस स्टेशन, समुद्रपुर येथील अवैध हातभट्टी दारु विक्रेत्यास एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन समुद्रपुर, जि. वर्धा अंतर्गत वार्ड क्रमांक १५. समुद्रपुर परिसरात अवैधरित्या देशी व विदेशी दारुची विक्री करणारा इसम नामे नितेश उत्तमराव डंभारे वय २७ वर्ष राह. बार्ड क्रमांक १५० समुद्रपुर ता. समुद्रपुर जि. वर्धा याचे विरुध्द पोलीस स्टेशन, समुद्रपुर जि. वर्धा येथे सन २०२१ ते २०२५ पावेतो महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत एकुण १४ गुन्हे दाखल आहेत. स्थानबध्द इसमाविरुध्द वेळोवेळी प्रचलीत कायदयान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली होती. परंतु अशा प्रतिबंधक कार्यवाहीस सदरहू स्थानबध्द इसम हा नजुमानता अवैधरीत्या देशी व विदेशी दारुची दारुची विक्री करीत होता. ज्यामुळे पोलीस स्टेशन, समुद्रपुर अंतर्गत येत असलेल्या बार्ड क्रमांक १५, समुद्रपुर परिसरातील सार्वजनीक स्वास्थास धोका निर्माण होवून सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था बाधीत झाली होती. तसेच पोलीस स्टेशन, समुद्रपुर परिक्षेत्रातील वार्ड क्रमांक १५. समुद्रपुर तसेच आजुबाजुचे खेडेगावातील मोठ्या प्रमाणात महपी लोकांचा जनसामान्यांना तसेच महीला मुलीना खुप त्रास बावत बालला होता.

ठाणे प्रभारी अधिकारी स.पो.नि. रविंद्र रेवतकर, यांनी एम.पी.डी.ए. कायदयान्वये स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे मार्फतीने मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्षा श्रीमती बाल्मची सी. यांना सादर केला होता. त्या अनुषंगाने मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी, वर्धा यांनी दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी आदेश जारी करुन त्याला अमरावती मध्यवती कारागृहात, अमरावती येथे स्थानबध्द करण्यात आले आहे.

आगामी येणारे सण उत्सव व निवडणूक शांतता पूर्ण बातावरणात पार पाडण्याचे उददेशाने अशा अवैधरीत्या दारु विक्रेत्यावर, अवैधरीत्या दारुचा विक्री करण्याकरीता पुरवता करणाऱ्या दारु विजेत्यावर तसेच समाजातील गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक असणा-या व्यक्तीवर तसेच रेती माफीचा यांचेवर एम.पी.डी.ए. कायदयांर्तगत कठोर कार्यवाहीचे पुनश्च संकेत मा. जिल्हादंडाधिकारी तथा जिलाधिकारी, वर्धा श्रीमती वान्मथी सो.. तसेच मा. पोलीस अधीक्षक वर्धा श्री. सौरभ कुमार अग्रवाल, यांनी दिलेले आहेत.

सन २०२५ साली आज पावेतो एकुण १८ दारु विक्रते, गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर तसेच रेती माफीया यांचेवर एम.पी.डी.ए. कायदयांर्तगत कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे. तसेच सन २०२६ वर्षाची एम.पी.डी.ए. कायद्या अंतर्गत ही दुसरी कार्यवाही आहे. अवैध दारु विक्रेते, गुंड प्रवृत्तीच्या धोकादायक व्यक्ती व रेती माफीयांवर कठोर कार्यवाही करण्याचे संकेत मा. पोलीस अधीक्षक, वर्षा श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिलेले आहे.

मा. जिल्हाधिकारी, वर्धा व मा. पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे बेधडक मोहीमेमुळे अवैध दारू विक्रेते, गुंड प्रवृतीच्या धोकादायक व्यक्ती तसेच रेती माफीया मध्ये प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे.

सदरची कार्यवाही मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा. श्री. सदाशिय वाघमारे, अपर पोलीस अधिक्षक, वर्धा श्री. सुशीलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, पोनी विनोद चौधरी, स्थानिक गुन्हे शारका, वर्धा यांचे मार्गदर्शनाखाली पोहवा/अमोल आत्राम, पोहवा आशिष महेशगोरी, नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा. वर्धा, स.पो.नि. रविंद्र रेवतकर, पोलीस अंमलदार आशिष मेश्राम पोलीस स्टेशन, समुद्रपुर यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये