ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवादासनगर येथे नविन आरोग्य उपकेंद्र मंजूर

सरपंच विमलताई राठोड यांच्या मागणीला यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- नोकेवाडा ग्रामपंचायतीचे सरपंच विमल राठोड यांनी व जिवती पंचायत समितीचे माजी उपसभापती महेश देवकते यांनी जिल्हा परिषद, चंद्रपूरचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे, माजी आमदार संजय धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्ये व मत्स्यव्यवसाय मंञी तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंञी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करत मागणी लाऊन धरली होती, ती नुकतीच पूर्णत्व:स आल्याने मौजे:सेवादासनगर गावांसह परिसरातील गावातील नागरिकांना आरोग्याच्या उत्तम सुविधा मिळणार असल्याने, परिसरातील नागरिकांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे.

          मौजे: सेवादासनगर गावातील गावप्रमुख उत्तम राठोड (नाईक), रोहिदास जाधव (कारभारी), ज्येष्ठ नागरिक धोंडीराम आडे, दत्ता राठोड, धनराज आडे, पांडुरंग चव्हाण, रामराव राठोड, बापूराव जाधव, उत्तमजी चव्हाण, गोविंद जाधव, परशुराम चव्हाण, प्रभू राठोड, बाबू जाधव, गणपती जाधव, धनूजी राठोड, साहेबराव राठोड (माजी पोलीस पाटील), पंडित राठोड, बंडूजी राठोड, विठ्ठल धों.राठोड, संजय राठोड, प्रभूजी जाधव, गोविंद पवार, भिमराव पवार, सुभाष आडे, बालाजी पवार, शेषेराव पवार, व्यंकटी जाधव, शंकर भि. राठोड, मधुकर चव्हाण, राजेभाऊ जाधव, भगवान राठोड, उत्तम जाधव, गंगाधर पवार, वसंतराव राठोड, किसन नामदेव राठोड, संजय चव्हाण, वैजनाथ आडे, रघुनाथ आडे, विश्वनाथ आडे, संजय जाधव, मौजे: महाराजगुडा येथील नाईक गणेश चव्हाण, कारभारी चंदुजी पवार, उत्तम पवार, उल्हास जाधव, वामन पवार, उखंडराव चव्हाण, उमाजी जाधव, बाबू राठोड, तुकाराम राठोड, प्रकाश जाधव, आनंदराव राठोड, विजय राठोड, प्रकाश राठोड, पांडूरंग चव्हाण, सोमला चव्हाण, संभाजी गिरसेट, सटवाजी मेटकर, गोविंद हरी जाधव तसेच गावातील गोर-गरिब, कष्टकरी, शेतकरी, मजूर, वयोवृद्ध महिला व गावातील जनतेला आपल्या गावातचं उत्तम आरोग्य सुविधा मिळण्यासाठी शासनस्तरावर वेळोवेळी प्रयत्न करुन, आरोग्य उपकेंद्राला मंजूरी

मिळाली असल्याने, सेवादासनगर गावासह परिसरातील गावातील नागरिकांनी अभिनंदन व्यक्त करुन, शुभेच्छा दिल्या आहेत.

          आरोग्य उपकेंद्रास (Sub-PHC) राज्याचे वने, सांस्कृतिक कार्ये व मत्स्य व्यवसाय मंञी तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंञी सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नांमूळे सरकारकडून मंजूरी मिळाली असून, लवकरचं मौजे: सेवादासनगर येथील आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचे बांधकाम सुरु होऊन, नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये