Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विसापुर येथे मिश्र रोपवनात वृक्षारोपन करुन पर्यावरण दिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

दि.५ जुन २०२४ पर्यावरण दिनानिमित्त बल्हारशाह वनपरिक्षेत्रात सन २०२४ चे पावसाळयाकरीता प्रस्तावित असलेले मिश्र रोपवन २०२४ कक्ष क्रमांक ४५१ मानोरा, मिश्र रोपवन २०२४ कक्ष क्रं.४४६ उमरी व मिश्र रोपवन २०२४ कक्ष क्रमांक ५७८ विसापुर १ येथे वृक्षारोपन करुन पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला.

मानोरा येथील मिश्र रोपवनात सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह नरेश भोवरे, संयुक्त वनव्यवस्थापन समिती, मानोरा अध्यक्ष अमोल ढोंगे, सामाजिक कार्यकर्ता रमेश पिपरे यांचे शुभ हस्ते वृक्षारोपवन करुन पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील क्षेत्रीय वनकर्मचारी व कामावरील मजुर उपस्थीत होते. त्यानंतर उमरी येथील मिश्र रोपवन कक्ष क्रं. ४४६ येथे वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह नरेश भोवरे, ग्राम पंचायत, उमरी पोदार सरपंच श्रीमती. लेणगुरे, संयुक्त वनव्यवस्थापन समिती, उमरी तुकुम अध्यक्ष परचाके, उमरी पोतदार अध्यक्ष देवईकर व बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी यांनी वृक्ष लागवड करुन पर्यावरण दिवस साजरा केला

विसापुर येथे मिश्र रोपवनात ग्राम पंचायत, विसापुर सरपंच वर्षा कुळमेथे, क्षेत्र सहाय्यक, बल्हारशाह कोमल घुगलोत, वनरक्षक कु. वर्षा पिपरे व सुधीर बोकडे यांनी यांनी वृक्ष लागवड करुन पर्यावरण दिवस साजरा केला. बल्हारशाह वनपरिक्षेत्रातील मौजा कारवा, किन्ही व कळमणा मध्ये वनकर्मचारी यांनी वृक्ष लागवड करुन पर्यारण दिवस साजरा केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये