ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती येथे पालखी सोहळ्यातून भक्ती, समता सर्वधर्माचे दर्शन

जणू गुरुकुंज अवतरले : वं.राष्ट्रसंतांची महासमाधीची प्रतिकृती ठरले आकर्षण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      हनुमान नगर भद्रावती येथे रामधून वर्धापन दिन विविध कार्यक्रम, भव्य पालखी शोभायात्रा मिरवणूक, हजारो गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहाने आनंदाने पार पडला.

 ज्येष्ठ गुरुदेव सेवक मधुकर धाबेकर, संबाशिव दिवसे, विनोद रासेकर यांचे हस्ते घटस्थापना,अधिष्ठानाचे पूजन व द्वीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर प्रातःकाळी सामुदायिक ध्यान संपन्न झाले याप्रसंगी विशाल गावंडे यांनी चिंतन प्रकट केले. दुपारी १ वाजता आदर्श बाल गुरुदेव भजन मंडळ भद्रावती यांचा भजनाचा कार्यक्रम तसेच संत ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ महिला मंडळ, सुमठाना यांना हरिपाठ सादर केला.सायंकाळी सामुदायिक प्रार्थनेवर शुभांगी कुत्तरमारे यांनी चिंतन प्रकट केले त्यानंतर गुणवंत कुत्तरमारे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर रवींद्रजी पचारे यांचा मनोरंजनातून प्रबोधनात्मक भारुडाचा कार्यक्रम संपन्न झाला.

दिनांक २५ जानेवारी ला सामुदायिक ध्यान प्रसंगी खुशाल कंचर्लावार यांचे चिंतन लाभले व त्यानंतर भव्य पालखी सोहळा मिरवणूक हनुमान नगर परिसराततून अनेक भजनी दिंडी,वं.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित विविध झाकी, देखावे,अनेक संत थोर महापुरुषांचे प्रतिमा विशेषता वं.राष्ट्रसंतश्रीतुकडोजी महाराजांची गुरुकुंज आश्रम मोझरी येथील समाधीची प्रतिकृती सुधाकर सतीबावणे व सहकारी मंडळी यांचे वतीने करण्यात आलेली या सोहळ्यांचे आकर्षण होती या सोहळ्यामध्ये हजारोचे संख्येने गुरुदेव भक्त अत्यंत उत्साहाने सहभागी झाले जणु काही गुरुकुंजच अवतरले. या मिरवणुकीतून सर्वधर्मांचे दर्शन घडले. याप्रसंगी ओमप्रकाश पांडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यानंतर ह.भ.प. योगेश प्रधान महाराज यांचा गोपालकाल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी प्रार्थनेतील सर्व मुलांना गणवेश वाटप करण्यात आला व दर गुरुवारला भजन करणाऱ्या महिलांना साडी देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता हनुमान नगर येथील युवा कार्यकर्ते, गुरुदेव सेवाप्रेमी बंधू भगिनींचे महत्त्वाचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये