ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोनुर्ली गावाजवळ भीषण अपघात

दोघांचा जागीच मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

      कोरपना गडचांदूर राष्ट्रीय महामार्गावर सोनुर्ली गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. दिनांक 5 ला सायंकाळच्या सुमारास या अपघातात कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वरांना धडक दिल्याची माहिती समोर आली आहे अपघातामध्ये दुचाकीस्वरांचा जागीच मृत्यू झाला यामध्ये समिर मडावी रा. खडकी, प्रियंका कुडसंगे रा. धानोली असे मृतकांचे नावे असून दोघेही नातेवाईक आहे.

        सदर अपघातात इतका जोरदार होता कि, धडकेने समीर आणि प्रियंका लांब उडून पडले त्यामुळे डोक्याला जबर मार लागल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला सदर घटनेची माहिती कोरपणा पोलीस स्टेशनला मिळतात घटनास्थळी पोचले पुढील तपास कोरपणा पोलीस स्टेशन करीत आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये