ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालयातर्फे चोरा येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने शिबिराचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    भद्रावती येथील डॉ. विवेक शिंदे प्रशासकीय महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या सहकार्याने चोरा येथे श्रमदान शिबीर घेण्यात आले. यावेळी श्रमदान शिबिर कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे सचिव डॉ. कार्तिक शिंदे यांच्या मार्गदर्शनात पार पडले.

कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. नेहा मानकर उपस्थित होते. प्राचार्य प्रमोद पाठक यांनी प्रास्ताविकात कार्यक्रम आयोजित करण्यामागील हेतू स्पष्ट केला. अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रा. प्रशांत पाठक यांनी भारताला आज तरुणांची खरी गरज असून प्रत्येकाने स्वयंसेवेने पुढे येण्याची गरज असल्याचे सांगितले. असे असले तरी तरुणांची दिशा चुकत आहे. कारण ते सामाजिक ऋण विसरले आहेत. ती सामाजिक उत्तरदायित्व फेडण्याची सुवर्णसंधी राष्ट्रीय सेवा योजनेने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी श्रमदान शिबीरात सहभाग घेण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास साधला जातो, नेतृत्व गुण व समाजाचे ऋण या योजनेच्या माध्यमातून व्यक्त केले जाते तसेच योजनेच्या शिबिरात आपत्ती व्यवस्थापन व महापुरुषांचे विचार इत्यादी विषयांवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे मत प्रा. कपिल राऊत यांनी मांडले असून प्रा. विशाल प्रसाद (एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी) यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व नियमांचे पालन करून विद्यार्थांनी राष्ट्रीय चळवळीत सहभागी होण्यास आजची तरुण पिढी नेहमीच पुढे असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयातील असंख्य विद्यार्थांची उपस्थिती असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रज्ञा लांडे (सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी)यांनी केले असून कार्यक्रमाचे आभार प्रा. प्रिती कनकट्टीवार यांनी मानले.

कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले असून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये