ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घरकुल धारकांना रेती उपलब्ध करून द्यावी

राजु झोडे यांच्या तहसीलदारांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

बल्लारपूर तालुक्यातील घरकुल धारकांना रेती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ग्राम विकास कृती समितीने केली असून तसे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.शासनाकडून अनेकांना घरकुल मंजूर झाले आहेत, मात्र रेती अभावी बांधकाम रखडले असून अवैध रेती तस्करी करून चढ्या भावाने रेतीची बेभवपणे विक्री सुरू आहे.त्यामुळं घरकुल धारकांची आर्थिक पिळवणूक होत आहे.

बल्लारपूर तालुका व विसापूर गावातील काही भाजपचे कार्यकर्ते रेतीची अवैध तस्करी करत असून पाच ते सहा हजार रुपये ट्रॅक्टर प्रमाणे रेतीची विक्री करत आहेत.याबाबत तहसीलदार यांनी रेती तस्करांवर कारवाई करावी व घरकुल धारकांना रेती अल्प दरात उपलब्ध करून द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.तसे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे.यावेळी राजु झोडे, संपत कोरडे, राजु लाडंगे,श्याम झिलपे,बळी नरूले, संजय सुर्यवंशी  आदि लोग उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये