Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाऔष्णिक विद्युत केंद्र येथे जागतिक पर्यावरण दिवस साजरा

"भूमी पुनर्संचय आणि वाळवंटीकरण साठी जागरूकता कार्यक्रम"

चांदा ब्लास्ट

     दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात येतो. पर्यावरणबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी या दिवसाचे महत्व आहे. मनुष्य आणि पर्यावरण यांचे अतुट नाते आहे. युनायटेड नेशन्स एन्व्हायन्मेंट प्रोग्राम (UNEP) च्या नेतृत्वाखाली १९७३ पासून दरवर्षी आयोजित केले जाणारे, हे पर्यावरणीय प्रसारासाठी सर्वात मोठे जागतिक व्यासपीठ आहे.

जगभरातील लाखो लोक हा दिवस उत्साहाने साजरा करतात. या वर्षी जागतिक पर्यावरण दिवस २०२४ ची थीम “जमीन पुनर्संचयित करणे, वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिबंध (Land restoration, desertification and drought resilience)” अशी आहे. ज्यामध्ये जमीन पुनर्संचयित करणे, वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिकारशक्ती यावर लक्ष केंद्रित केले जाईल. भूमी जीर्णोद्धार हा पर्यावरणाच्या पुनर्संचयनावर (२०२१-२०३०) UN दशकाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे, जो जगभरातील परिसंस्थाचे संरक्षण आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी एक मोठा आवाज आहे आणि शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

पर्यावरण दिनानिमित्य नागरिकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणबद्दल जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने ४ जून रोजी ऊर्जानगर वसाहतीतील अधिकारी मनोरंजन केंद्र सभागृह येथे पर्यावरण या विषयावर चित्रकला स्पर्धा आणि घोषवाक्ये स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धांमध्ये ऊर्जानगर वसाहतीतील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेऊन भरपूर प्रतीसाद दिला.

यावर्षी ५ जून रोजी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर यांनी संयुक्तिकपणे जागतिक पर्यावरण दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉपर्पोरेशन लिमिटेड यांनी देखील कंपनीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन तसेच चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण दिवस साजरा केला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र परिसरातील ग्रीट फिल्टर येथील “बायोडायव्हरसिटी ऑर्चार्ड (BIODIVERSITY ORCHARD)” येथे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता श्री. गिरीश कुमरवार यांनी केले. चं.म.औ. वि. केंद्राचे मुख्य अभियंता श्री. गिरीश कुमरवार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी श्री. उमाशंकर भादुले, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे उपमहाव्यवस्थापक नवीन कुमार व प्रशांत पराते, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलचे डेप्युटी कमांडंट गिरिषण. पी, जलबिरादरी स्वयंसेवी संस्थेचे सदस्य संजय वैद्य यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

तसेच हा कार्यक्रम चं. म. औ. वि. केंद्राचे उपमुख्य अभियंता डॉ. भूषण शिंदे, प्रफुल्ल कुटेमाटे, अनिल पुनसे (प्रभारी), अशोक उमरे (प्रभारी), वित्त आणि खाते विभागाचे महाव्यवस्थापक बाहुबली डोडल, मानव संसाधन विभागाचे महाव्यवस्थापक नंदकिशोर चन्ने, अधिक्षक अभियंता पद्माकर कामतकर, मिलिंद रामटेके, विष्णु ढगे, श्रीमती झीनत पठान, वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता बोधलकर, अग्निशमन अधिकारी ज्ञानेश्वर ढोमने, कल्याण अधिकारी दिलीप वंजारी, सुरक्षा अधिकारी गोंगले कार्यकारी अभियंता विनोद उरकुडे; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी श्री. सुरेन्द्र कारनकर; यांच्या उपस्थितीत यशस्वीपणे पार पडला.

या प्रसंगी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात शाश्वत विकासाच्या दिशेने वेळोवेळी केलेल्या विविध उपाययोजना तसेच भविष्यातही पर्यावरणपूरक वीज निर्मिती करण्यासाठी चं. म. औ. वि. केंद्र सतत कार्यरत राहील असे संबोधन मुख्य अभियंता श्री. गिरीश कुमरवार यांनी केले.

तसेच या कार्यक्रमास कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ डॉ. विजय येऊल, अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ माया डफाडे, पुरुषोत्तम पडघन, विनोद कंगाली, उपकार्यकारी रसायनशास्त्रज्ञ लीलाधर नागपुरे, स्नेहल पाटील, सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ विकास परतेकी, डॉ. अंकुश कुलरकर, मुग्धा डोंगरे, कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ कु. मीनल जाधव व तंत्रज्ञ, ए. बी. राजूरकर, जी. आर. नवले, अब्दुल शेख, बी. एस. येवले, यांचे सहयोग लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये