ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
दयाचंद जैन यांना मातृशोक
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा येथील स्वप्नपूर्ती रेसिडेन्सी येथील रहिवासी तथा नगर परिषद मधील कर्मचारी दयाचंद सुभाषचंद जैन (साहूजी)यांच्या मातोश्री व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल सावजी यांच्या मोठया भगीनी श्रीमती प्रतिभाताई जैन यांचे वयाच्या 72 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने दिनांक 3 डिसेंबर 25 रोजी सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ धाम स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात 2 मुले,1 मुलगी,5 भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे.



