ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पोलिसांची तत्परता : अल्पवयीन मुलगी पालकांच्या स्वाधीन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती येथील नामे काजल सुनील पचारे हि अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल झाली. फिर्यादीच्या तक्रारीवरून भद्रावती पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक ४२६/२०२० कलम १३७ (२) बी. एन. एस. अंतर्गत गुन्ह्याची नोंद करून पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी यांचे मार्गदर्शनात सपोनी केदारे, यांचे नेतृत्वात पो. अं. रोहित चिटगीरे, मपोअं. पूजा पंधरे यांनी तपासाची चक्रे फिरवून तातडीने शोध घेतला असता सदर अल्पवयीन मुलगी हि मौजा. वायगाव तालुका. भद्रावती जिल्हा. चंद्रपूर येथे असल्याची खबर मिळाली.
तिला तातडीने ताब्यात घेऊन पोलिस स्टेशन भद्रावती येथे आणण्यात आले. उचित कार्यवाही करून सर्वांसमक्ष मुलीला तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले.



