ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विकास विद्यालय येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

    लोकसेवा मंडळ विहीरगाव द्वारा संचालित विकास विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय विहीरगाव ता सावली जि चंद्रपुर येथे दि. 28 फेब्रुवारी 2026 रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये साहित्यिक अभिव्यक्ती वाढविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे वाचन, लेखन, श्रवण, भाषण,भाषा समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनातून उपक्रमाचा एक भाग म्हणून कविता लेखन करणे कविता गायन करणे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

 याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वलिखित अथवा कोणतीही कविता गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होत.

डॉ गावंडे सर यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत कवी कुसुमाग्रजांच्या चरित्रावर प्रकाश टाकला मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले. आणि साहित्य याविषयी माहिती दिली. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना साहित्याची ओळख व्हावी म्हणून स्वलिखित कवितेचे वाचन केले. कुसुमाग्रजांच्या स्मृतीला अभिवादन केले.

श्री. समर्थ सर यांनी कवी लेखक साहित्यिक यावर महत्त्वपूर्ण माहिती दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या गराटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे थोर साहित्यिक तथा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना उजाळा देवून त्यांचा साहित्याचा परिचय करून दिला. त्याचबरोबर मराठी भाषेचे महत्त्व अतिशय साहित्यिक वाणीतून व्यक्त केले. विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्वही याप्रसंगी सांगितले नंतर कविता वाचनही केले.

       याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक कोकाटे सर , कराणकर सर, मोटघरे सर, नंदनवार सर, चावरे सर, नक्षिणे मॅडम, डॉ गावंडे सर, समर्थ सर प्राध्या. कोचे सर, पुरेल्लिवार सर, राऊत सर, प्राध्या शेंडे सर, प्राध्या. चुधरी सर,प्रा उंदीरवाडे सर, कु.मस्के मॅडम कु. मुरकुटे मॅडम मंचावर उपस्थित होते.

श्री चौधरी सर यांनी अतिशय भावनिक होऊन आई या कवितेचे गायन केले.

प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मराठी भाषेचा इतिहास आणि मराठी भाषेतील महान ग्रंथ,थोर साहित्यिक व कवी याविषयी माहिती देत आपल्या दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन केले.

ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आलेली होती. वर्ग पाचवा ते वर्ग सातवा एक गट आणि वर्ग आठवा ते बारावा दुसरा गट असे दोन गट होते. या स्पर्धेत 87 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये पहिल्या गटात प्रथम क्रमांक कु साक्षी बोटकावार, द्वितीय क्रमांक गुंजन मस्के, तृतीय क्रमांक लक्षित वरखडे आणि दुसऱ्या गटातील प्रथम क्रमांक स्नेहा बांबोळे, द्वितीय क्रमांक पपीता जनबंधू, तृतीय क्रमांक समीक्षा घोडमारे, प्रोत्साहनपर चंदा दिवटे विजेता स्पर्धकांना पुष्पगुच्छ आणि शील्ड देऊन सन्मानित करण्यात आले.

भाषण स्पर्धेचे परीक्षण कुळमेथे सर, चौधरी सर, प्राध्या. पी मोटघरे सर तर वेळाधिकारी म्हणून श्री धोटे सर यांनी काम केले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बोबाटे मॅडम आणि आभारप्रदर्शनाची जबाबदारी ज्येष्ठ शिक्षिका नक्षीने मॅडम यांनी पार पाडली.

  कार्यक्रमाला शाळेतील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षक- शिक्षिका वृंद तथा शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये