ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विशेष मोहीम _ दारू पिवुन गाडी चालविण्याऱ्या पाच ईसमांवर कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दि.०३.०३.२०२६ रोजी उपजिल्हा वाहतुक शाखा हिंगणघाट यांनी विशेष मोहीम राबवुन दारू पिवुन गाडी चालविण्याऱ्या पाच ईसमांवर मोवाका १८५ अन्वये कार्यवाही केली. मो.सा.क एम.एच.३२ ए.ई.८८६२ चा चालक नामे प्रशांत रामाजी बोरकुटे वय ३९ वर्ष रा. हमदापुर ता.सेलु. जि. वर्धा, मो.सा.क एम.एच.३२ झेड ३९२५ चा चालक नामे गणेश गोविंदराव पाल वय ४२ वर्ष रा. शिवाजी मार्केटच्या मागे संत गोमाजी वार्ड हिंगणघाट जि. वर्धा, मो.सा.क एम.एच.३२एच.२२४ चा चालक नामे रविद्र भिमराव वनकर वय ३९ वर्ष रा. भिमनगर वार्ड हिंगणघाट जि. वर्धा, मो.सा.क एम.एच.३२ ए.डी.७६५८ चा चालक नामे राहुल अशोकराव घवघवे वय ३२ वर्ष रा. सातेफळ ता. हिंणघाट जि. वर्धा, मो.सा. क एम.एच ३२ ए.पी ९६६९ चा चालक नामे प्रफुल जनार्धनजी गहुकर वय ३५ वर्ष रा.पिंपरी पोस्ट गिरड ता. समुद्रपुर जि. वर्धा या दुचाकी चालकावर पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदरची कार्यवाही उपजिल्हा वाहतूक शाखा हिंगणघाटचे पोउपनि शरद आवारे, ग्रेड मपोउपनि मुसळे, पोहवा भोयर, पोशी शिवाजी पाटील यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये