ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

झाडीबोली साहित्य मंडळातर्फे दिवं. आचार्य नागो थुटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

      झाडीबोली साहित्य मंडळाचे माजी केंद्रीय पदाधिकारी, ज्येष्ठ साहित्यिक, कवी आचार्य ना. गो. थुटे यांचे वृद्धापकाळाने वरोरा येथे दुःखद निधन झाले. त्यांना झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर शहर शाखा आणि राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने आभासी पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

अध्यक्षस्थानी झाडीबोली साहित्य मंडळाचे केंद्रीय सदस्य ग्रा. बंडोपंत बोढेकर होते. यावेळी राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे चिटणीस एड. राजेंद्र जेनेकर(राजुरा), डॉ. श्रावण बानासुरे (बल्लारपूर), श्रीकांत धोटे (अमरावती), यमाजी गाऊत्रे( तेलंगणा), मनोहर बोबडे, विनायक सोयाम, ग्रामगीता परीक्षा विभागाचे सुभाष पावडे , डॉ . धर्मा गावंडे, नामदेव गेडकर (चंद्रपूर), राजुरा तालुका श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे प्रचार प्रमुख पांडुरंग शेंडे (देवाडा), मुल शाखेचे ग्रा. नामदेव पिज्दूरकर,ग्रा. सुखदेव चौथाले, झाडीबोली साहित्य मंडळाचे जिल्हाप्रमुख अरूण झगडकर (गोंडपिपरी), वरोरा शाखेचे अध्यक्ष ग्रा. पंडित लोंढे, गडचिरोली शाखेचे उपेंद्र रोहणकर, ग्रा. नत्थुजी चिमूरकर, खेमदेव हस्ते आदींनी दिवंगत नागो थुटे यांच्या विषयीच्या आपल्या आठवणी आणि शोक संवेदना व्यक्त केल्यात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नामदेव मोरे यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये