ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घरफोडीचा गुन्हा उघड _ अट्टल घरफोडी करणारे चोरटे जेरबंद

एकूण 10 लाख 41 हजाराचा मुद्देमाल हस्तगत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

            गुन्ह्यांची हकीकत याप्रमाणे आहे कि,दिनांक 01.02.2026 रोजी फिर्यादी नामे श्री प्रवीण अंबादासजी लोहवेरा.समता नगर वर्धा यांनी पो. स्टे. वर्धा शहर येथे येऊन तक्रार दिली कि फिर्यादी हा परिवारासह दुपारी 2/30 वा च्या दरम्यान कार्यक्रमा करिता बाहेरगावी गेले व सायंकाळी 5/30 वा घरी परत आले असता फिर्यादीला त्यांचे घराचे बंद दरवाजाला कुलूप लावून दिसले नाही वरून फिर्यादीने घराचे आत जाऊन बघितले असता. बेडरूम मधील दोन्ही अलमारितील सामान अस्ताव्यस्त पडून दिसले. वरून फिर्यादीने दोन्ही आलमारीची ची पाहणी केली असता. अलमारी मध्ये ठेवून असलेली सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल दिसून न आल्याने फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून कोणीतरी अज्ञात चोरट्याने बंद घरच्या आत प्रवेश करून वरील मुद्देमाल चोरून नेला अशा फिर्यादी चे तक्रारीवरून पोलीस स्टेशन वर्धा शहर अप क्रमांक 90/2026 कलम ३०५(अ), ३३१ (3) बी एन एस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

          नमुद गुन्हा अज्ञात आरोपीतांनी केला असल्याने तो उघड होण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथक सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते तपासा दरम्यान वर्धा जिल्हा लगत असलेले जिल्हा चंद्रपूर , नागपूर व यवतमाळ या जिल्ह्यातील , घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार यांना तपासण्यात आले. तपासा दरम्यान पोलिसांनी तांत्रिक पुरावे गोळा करून व गोपनीय बातमीदार लावून तपास करीत असताना दिनांक 27/02/26 रोजी गोपनीय सूत्रांकडून मिळाल्या माहितीवरून यवतमाळ जिल्ह्यातील घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार नामे

1) विवेक उर्फ मांडा बबन मंगरे वय 19 वर्ष रा. तलाव फैल यवतमाळ 2) आकाश उर्फ रॅपर राजू वाढवे वय 22 वर्षे रा. तलाव फैल यवतमाळ हल्ली मुक्काम पुणे यांनी सदरची घरफोडी केल्याचे माहिती मिळाल्यावरून त्यांचा शोध करिता पोलिस पथक यवतमाळ करिता रवाना होऊन त्यांचा शोध घेऊन शीताफिने गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेण्यात आले त्यांना सखोल विचार पूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देत चोरी केलेला मुद्देमाल त्यांचे दोन साथीदार नामे प्रसाद उर्फ दादू ज्ञानेश्वर देवकते वय 20 वर्ष राहणार तलाव फाईल पॉवर हाऊस जवळ यवतमाळ व आकाश उर्फ भुई सुरेश शेंडे वय 19 वर्ष रा.तलाव फाईल यवतमाळ यांच्या मार्फतिने विकल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले चारही आरोपीतांकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले 61 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 35 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व नगदी 1,41,500 /- रुपये गुन्ह्यात वापरलेले मोपेड वाहन , मोबाईल व इतर साहित्य असा एकूण जुमला किंमत 10, 41, 000/- रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीत्यांना पुढील कारवाई करिता पोस्टे वर्धा शहर यांचे ताब्यात देण्यात आले.

सदर ची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक , मा. सौरभकुमार अग्रवाल अपर पोलीस अधीक्षक मा .सदाशिव वाघमारे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा पोलीस निरीक्षक विनोद चौधरी,पो. उप.नि विजयसिंग गोमलाडू,पो.उप. नि प्रकाश लसुंते, पोलीस अंमलदार शेखर डोंगरे. अरविंद येनुरकर, रोशन निंभोरकर, रवि पुरोहित, विकास मुंढे, सुगम चौधरी,शुभम राउत, अभिषेक नाईक चालक राहुल लुटे रितेश गेटमे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा सायबर सेल चे पोलीस अंमलदार दिनेश बोथकर, अक्षय राऊत गोविंद मुंडे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये