Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आज शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी मेळावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

            शेतकरी संरक्षण समिती, महाराष्ट्र राज्य,भारतीय जनसंसद महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने शेतकरी समस्या निराकारण शेतकरी मेळाव्याचे आयोजन दि.७ जूनला सकाळी ११ वाजता स्थानीय राजमनी लॉन गवराळा येथे करण्यात आले आहे.या मेळाव्यात शेतकरी, शेतमजुर यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

  कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकजी सब्बन, राज्य अध्यक्ष, भारतीय जनसंसद महाराष्ट्र राज्य, मुंबई.हे राहतील तर मूख्य मार्गदर्शक म्हणून विजयलक्ष्मी बिदरी (भा.प्र.से.), आयुक्त नागपूर विभाग, नागपूर.या राहतील.याप्रंगी विनयजी गौडा (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, चंद्रपूर,विवेक जॉनसन (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. चंद्रपूर, मुमक्का सुदर्शन (भा.पो.से.), जिल्हा पोलिस अधिक्षक चंद्रपूर, जितेंद्र रामगावकर (भा.व.से), मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, शंकर तोटावार, अधिक्षक, कृषी अधिकारी, चंद्रपूर, विभागीय कृषी सह संचालक, नागपूर. संध्या चिवंडे, अधिक्षक अभियंता, विज वितरण कंपनी चंद्रपूर, प्रमोदकुमार, मुख्य महाप्रबंधक, (वे.को.ली.) माजरी क्षेत्र,अॅड. भुपेंद्र रायपुरे, शेतकरी संरक्षण समिती, विधी सल्लागार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे

या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन शेतकरी संरक्षण समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव बडखल यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये