पडेगावाकडे जाणाऱ्या नादुरुस्त रस्त्याच्या दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर सुरु

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : गावकऱ्यांना नाहक त्रास ठरलेल्या सालोड कडून पडेगाव कडे जाणाऱ्या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याची दुरुस्ती अखेर सुरु करण्यात आली.अनेक दिवसांपासून दुर्लक्षित राहिलेल्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांवर डांबरीकरण करुन खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आले.गावातील नागरिकांनी आणि साप्ता.वर्धा की बात या वृत्तपत्राने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर डांबर व मुरुमाचा वापर करुन जात लवकरच हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे उत्कृष्ट कंत्राटदार जवाहर यादव उर्फ महाराज यांनी सांगितले आहे.
चाळण झालेल्या रस्त्याच्या दुरुस्ती चे सुरु करण्यात आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एकनाथ टिकले, उत्कृष्ट कंत्राटदार जवाहर यादव उर्फ महाराज आणि साप्ता.वर्धा की बात चे मुख्य संपादक विल्सन मोखाडे यांचे गावातील नागरिकांकडून अआभार मानले जात आहे.


