ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेकच्या अफलातून अंडर पास रस्त्यातून १० गावाचा रस्ता

मोठे वाहन व शेतकऱ्याचे हाल ?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

             गडचांदुर स्थीत पूर्वीचे माणिकगड सिमेट कंपनी सध्याचे अल्ट्राटेक कंपनीच्या कुसूंबी नौकारी स्थीत चूनखड्डी खदान परिसरातील पूर्वीचा वहीवाटीचा रस्ता उत्खनन करूण नाल्याचे काठाने दोन खदानीच्या मध्ये भागातून नविन रस्ता कंपनी व्यवस्थापन ने तयार केला परंतुया कंपनीला अंडरपास मार्ग बनवताना या भागातील शेतकऱ्यांचे वाहन वाहतुकीचे वाहन तसेच शेतीतील बैलबंडी जनावरांचा चारा किंवा कापूस गाठी घेऊन त्या अंडरपास मधून वाहन निघणार नाही याची जाणीव बांधकाम करताना कंपनीला झाली नाही का हा रस्ता स्वतंत्र पूर्व काळापासून गडचांदूर नोकरी कुसुंबी आसापुर जिवती असा आठ ते दहा गावाचा मार्ग असून वेळोवेळी तीव्रस्फोटक उत्खनन मुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो.
 एवढेच नव्हे तर या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांना देखील दुखापत होऊन दगावतात याबाबत अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा कंपनी प्रशासन नागरिकांच्या समस्याकडे दुर्लक्ष करीत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचा मंजूर झालेला रस्ता व हा रस्ता कंपनीला हस्तांतर झाला नसल्याचे तहसीलदार राजुरा यांचे आदेश असताना सुद्धा कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्त्याचे काम अडवून ठेवले आहे यामुळे खदाणी परिसरातीलएक ते दीड किलोमीटर रस्ता अर्धवट पडला आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूने मातीचे ढिगारे कंपनी कडून लावण्यात आले त्यामुळे हे ढिगारे रस्त्यावर कोसळून केव्हा वाहतूक बंद होईल याचाही नेम नाही कुसुंबी येथील व लिगनडोह येथील गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे पर्याय बाजूला गेट बसवण्यात आला.
मात्र २४ तास कंपनीच्या ओव्हरलोड वाहतुकीचे वाहन भरधाव वेगाने धावत असतात यामुळे कंपनीने निर्माण केलेला तीन मीटर उंचीचा अंडरपास हा मार्ग अफलातून ठरला आहे तातडीने कंपनीने उंची वाढवून नवीन बायपास रस्ता तयार करून द्यावा व बांधकाम विभागाचे अडविलेले रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी कुसूंबी येथीलआदिवासी नागरिकांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये