ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कृषी केंद्रासमोरून मोटारसायकल लंपास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
भरत गणेश सवडे रा सातेफळ यांची होंडा कंपनीची काळया कलरची मोटारसायकल क्रमांक MH-21-BS-1357 किंमत 40हजार रुपये ही पिंगाक्ष कृषी सेवा केंद्र, देऊळगाव राजा समोर पार्किंग करून यात्रेत गेले यात्रा करून परत आले असता मोटार सायकल उभी केलेल्या ठिकाणी दिसुन आली नाही.
मोटारसायलचा आजुबाजुला बराच शोध घेतला परंतु मोटारसायकल मिळुन आली नाही.
सदर घटना 12 ऑक्टोंबर रोजी रात्री 8 वाजता घडली,मोटारसायकल चोरी ची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल विनोद गवई करीत आहेत .