दारू पिवुन वाहन चालविणाऱ्या चालकांवर कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 07/03/2026 रोजी वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा येथील 2 हि मार्शल अंमलदार यांनी मा. पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल सर यांच्या आदेशानुसार पोलीस अंमलदार सफौ संजय भांडेकर ब.क 1012, पोहवा सफौ अनिल तिवारी ब.क. 443 पोशि दिलीप कामडी 163. पोहवा मुकेश राउत ब.क. 1265 असे बस स्टॉन्ड समोरील रोडवर पेट्रोलींग करून वाहने चेकींग केली असतांना सदर अॅटो क MH 31 CQ 8771 चा चालक आपले अॅटो निष्काळजीपणे भरधाव वेगाने चालवितांना मिळुन आल्याने सदर वाहन चालक नामे 1) प्रलय मुकेश साखरे वय 42 वर्ष रा. हवलदारपुरा वर्धा हे दारू पिवुन असल्याचा संशय आल्याने सदर वाहन चालकास वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा येथे आणुन त्यांचे ब्रिथ अॅनालाईझर ने दारू पिवुन असल्याचे चेक केले असता त्यांचे रक्ता मध्ये 384 एमजी अल्कहोलचे प्रमाण मिळुन आले त्यांचेवर 185 मोवाका अन्वये पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला. अॅटो क MH 31 CQ 8771 या वाहनाचे कागदपत्र चेक केले असता मिळुन न आल्याने वाहन वानिशा वर्धा येथे डिटेन करण्यात आले आहे.
पो.नी. विलास पाटील वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा यांनी दारू पिवुन वाहन चालवु नये असे सर्वाना नागरीकांना आव्हान केले आहे.



