ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध रेती वाहतुकीवर तहसील प्रशासनाची कारवाई

रेतीने भरलेला ट्रॅक्टर जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         भद्रावती तहसील प्रशासनाने अवैध गौण खनिज वाहतुकीविरुद्ध धडक कारवाई करत रेतीने भरलेला एक ट्रॅक्टर जप्त केला आहे. पहाटेच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून महसूल विभागाने अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, भद्रावतीचे तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या गौण खनिज पथकाने (दि. ७ मार्च २०२६) पहाटे सुमारे २.४५ वाजताच्या सुमारास मौजा कुणाडा परिसरात छापेमारी केली. यावेळी फुकट नगर, भद्रावती येथील मनोज नंदी यांचा रेतीने भरलेला ट्रॅक्टर कोणतीही वैध परवानगी किंवा कागदपत्रांशिवाय वाहतूक करताना आढळून आला. पथकाने तत्काळ कारवाई करत संबंधित ट्रॅक्टर जप्त केला तसेच घटनास्थळी पंचनामा तयार करण्यात आला.

या कारवाईत गौण खनिज पथक प्रमुख तथा मंडळ अधिकारी अनिल दडमल यांच्या नेतृत्वाखाली खुशाल तुरारे, राहुल भोंगळे, ग्राम महसूल अधिकारी संदीप मुरकुटे तसेच बंडू वेलफुलवार यांनी सहभाग घेतला. पथकाने कारवाईदरम्यान आवश्यक कागदपत्रांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वाहन जप्त केले.

दरम्यान, जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर पुढील दंडात्मक कारवाईसाठी भद्रावती तहसील कार्यालयात जमा करण्यात आला असून प्रकरणाची चौकशी सुरू आहे. जिल्ह्यातील नदीपात्रातून अवैध रेती उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने अशी धडक कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये