ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीत तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी

शिवसेना उबाठा सह शिंदे गटाचा उत्स्फूर्त सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

   भद्रावती येथे नगर परिषद सत्तेत शिवसेनेचा वरचष्मा सर्वादित आहे. राज्यात सेनेत दुफळी जरी माजली तरीही सेनेच्या स्थापनेपासून मूळ शिव सैनिकांनी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याची परंपरा खंडित होऊ न देता अबाधित राखली आहे. एरवी आपल्या व्यक्तिगत कामात व्यस्त असणारे जुने जाणते स्व.बाबासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक मतभेद विसरून या निमित्याने आवर्जून एकत्र येतात हे विशेष.

उबाठा तालुका प्रमुख तथा स्वीकृत नगरसेवक नंदू पढाल , शहर प्रमुख घनश्याम आस्वले, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, माजी उपजिल्हा प्रमुख वसंता मानकर, शिवसेना शिंदे गटाचे पालिका अध्यक्ष प्रफुल चटकी, उपाध्यक्ष सुधीर सातपुते, सेनेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, व शिवसेना निष्ठावंत कार्यकर्ते यांच्या प्रमुख सहभागातून दिनांक.६ फेब्रुवारी रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. विशेष उल्लेखनीय म्हणजे राज्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व शिंदे सेना छत्रपतींच्या सन्मानार्थ एकत्र आल्याचा प्रत्यय भद्रावती कराना आला.

सर्वप्रथम सकाळी माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, शिवसैनिक दिलीप पारखी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा व परिसर स्वच्छ केला. सायंकाळी शोभायात्रा प्रारंभ प्रसंगी नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी राजे यांना अभिवादन करण्यात आले. नंतर भद्रावती पोलिस स्टेशन चे निरीक्षक योगेश्वर पारधी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य शोभा यात्रेचा प्रारंभ करण्यात आला. नगर परिषद जवळील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास मोरया ढोल ताशा पथकाने ढोलताशाच्या गजरात माल्यार्पण करून मानवंदना दिली.

शहरातील प्रमुख मार्गाने विविध शिवकालीन देखावे, आकर्षक रोषणाई, नेत्रदीपक आतिषबाजी, स्फूर्ती व चेतना दायक ढोल ताशांच्या गजर, साहसी क्रीडा प्रकार आदी सह जय शिवाजी जय भवानी च्या गजरात शिवजयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी भद्रावती पोलिस स्टेशन चे निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनात सर्वच पोलिस पथकाने कायदा व सुव्यवस्था राखण्यात उत्तम योगदान दिले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये