कवी संमेलन मध्ये बालकलाकाराने उडवून दिली धमाल
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा : शहरात जायंटस परिवाराचे वतीने गेल्या 28 वर्षापासून होळी उत्सवाचे निमित्ताने दरवर्षी मोठ्या प्रमाणात शहरवासीया साठी *हास्य व्यंग कवी संमेलनाचे आयोजन करण्यात येत असते* या वर्षी सुद्धा उपस्थित कवींनी श्रोत्यांना त्यांच्या मधुर वाणीने व हसवणूक करत मंत्रमुग्ध करून टाकले याच कवी संमेलनात अकोला येथील बालकवी प्रियांश वासरानी याने तर दोन स्वतः तयार केलेल्या कविता सादर करून धमाल उडवून दिली. मंच संचलन हास्य कवी किरण जोशी यांनी केले तर डॉक्टर ममता मेहता यांच्या मार्मिक कवितांनी उपस्थित श्रोते हास्याच्या गदारोळात न्हाऊन निघाले.
जायंटस परिवाराचे वतीने दोन मार्च 26 रोजी देऊळगाव राजा येथे होळी उत्सव निमित्ताने हास्य व्यंग कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये हास्य कवी किरण जोशी, डॉक्टर ममता मेहता, प्रदीप स्वामी, रवी नावानी,जगदीश यादव, व अकोला येथील बालकवी प्रियांश वासरानी यांनी सहभाग नोंदवला देश विदेश राजकीय सामाजिक यासह अनेक विषयावर या सर्व कवींनी हास्यमय सादरीकरण केले तर डॉक्टर ममता मेहता यांनी त्यांच्या मधुर वाणीने *रंग बदलती इस दुनिया मे रंगो के हैं खेल काले पिले हरी गुलाबी सब रंगो के मेल किसमे कितने रंगछूपे है कोई नही ये जाने रंगो की इस गारी को ढेल सके तो ढेल* यांनी राजनीतिक व सामाजिक व्यवस्थेवर हास्य सादर केले या मंचकावर बालकवी प्रीयांश वासराणी यांनी उपस्थितानच्या अंगावर शहारे आणणारी स्वलिखित कविता सादर केली *धोके से बंदी बना दिया कुछ घर के ही गद्दारोने जंजीरो मे जा पकड लिया उन धूर्त मुगल मक्करोने औरंगजेब ने शर्थ रखी झूकना यदि अंगीकार करो दे दूंगा राजपाट सारा इस्लाम अभि स्वीकार करो.
इतना सुनकर कवी कलश हंस बोले किसका सामना पडा पहचानो रावण सभा बीच बजरंग बली का ओझ खडा* हास्य व्यंग कवी संमेलन यशस्वी साठी जायंटस परिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले



