महिलांनी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून स्वतःच्या प्रगती सोबत समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे प्रा. अश्विनी जाधव मेहेत्रे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने जायंट्स वेलफेअर फाउंडेशन द्वारा संचलित जायंटस सहेली ग्रुप देऊळगाव राजाचे वतीने महिलासाठी दिनांक 6 मार्च रोजी *महिलांची नवी झेप डिजिटल भारताकडे व सोशल मीडिया फायदे व नुकसान यावर डिजिटल युगातील श्री समर्थ आहे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साथीने नव्या दिशा यावर मार्गदर्शन* करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रा अश्विनी जाधव मेहेत्रे यांनी सांगितले की महिलांनी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून स्वतःच्या प्रगती सोबत समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे तर डॉ. प्रियंका देशमुख यांनी सुद्धा सोशल मीडियाचे फायदे व नुकसान याबाबत सखोल मार्गदर्शन केले .
……….. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे निमित्ताने गायन शैली ग्रुपच्या वतीने सिविल कॉलनी स्थित श्री गणपती मंदिर परिसरात महिलांची नवी झेप डिजिटल भारताकडे यावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते डिजिटल युगातील स्त्री सामर्थ्य हे आहे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साथीने नव्या दिशा बाबत बोलताना अश्विनी जाधव मेहेत्रे यांनी सांगितले की महिलांचे राष्ट्रनिर्मितीतील योगदान अधोरेखित करत विकसित भारत घडविण्यात महिलांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.
Artificial Intelligence (AI) म्हणजे काय हे सोप्या आणि उदाहरणांसह महिलांना समजावून सांगितले.दैनंदिन जीवन, शिक्षण, शेती, आरोग्य व व्यवसायात एआयचा उपयोग कसा होऊ शकतो याबाबत माहिती दिली.डिजिटल युगात महिलांनी तंत्रज्ञानाशी जुळवून घेत आत्मनिर्भर बनण्याचे आवाहन केले.एआय आणि डिजिटल कौशल्ये आत्मसात केल्यास महिलांना नव्या रोजगार व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे नमूद केले.महिलांनी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून स्वत:च्या प्रगतीसोबत समाजाच्या विकासातही योगदान द्यावे, असा संदेश दिला.
उपस्थित महिलांनी विषयाबद्दल उत्सुकता व्यक्त करत एआयविषयी अधिक जाणून घेण्याची तयारी दर्शवली.तर सोशल मीडिया चे फायदे व नुकसान बाबत सखोल मार्गदर्शन करतांना डॉ. प्रियंका देशमुख यांनी सांगितले की सोशल मीडियाचे प्रमुख फायदे जलद संवाद* : फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राममुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या मित्र आणि नातेवाईकांशी व्हिडिओ कॉल किंवा मेसेजद्वारे त्वरित संपर्क साधता येतो माहिती आणि शिक्षण* शैक्षणिक, सामाजिक आणि जागतिक बातम्या घरबसल्या मिळतात. विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी माहिती शेअर करणे सोपे झाले आहे .व्यावसायिक विकास आणि मार्केटिंग* : व्यवसाय किंवा उत्पादनांची जाहिरात करून कमी खर्चात जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचता येते कला आणि कौशल्याचे प्रदर्शन* : युट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या प्लॅटफॉर्मवर आपली कला (गायन, नृत्य, पाककला, चित्रकला) दाखवून प्रसिद्धी आणि रोजगार मिळवता येतो रोजगार निर्मिती* : सोशल मीडियामुळे सोशल मीडिया मॅनेजर, इन्फ्लुएन्सर, डिजिटल मार्केटर अशा रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत मनोरंजन*: रील, व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून मनोरंजनाचे मोठे साधन जागरूकता*: सामाजिक मुद्यांवर जनजागृती करणे, मत मांडणे आणि राजकीय मतप्रवाह समजून घेणे सोपे झाले आहे सोशल मीडिया हा एक सशक्त संवाद आणि शिक्षणाचे माध्यम आहे, ज्याचा योग्य वापर (मर्यादेत) केल्यास वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगती होऊ शकते
सोशल मीडियाचे मुख्य तोटे
मानसिक आरोग्यावर परिणाम: तुलना, ट्रोलिंग आणि ‘लाईक्स’च्या हव्यासापोटी नैराश्य, चिंता आणि न्यूनगंड निर्माण होऊ शकतो
व्यसन : तासनतास रील्स किंवा पोस्ट स्क्रोल करण्याच्या सवयीमुळे (डूमस्क्रोलिंग) अभ्यासावर आणि कामावर गंभीर परिणाम होतो
चुकीची माहिती व अफवा:* फेक न्यूज वेगाने पसरून समाजात भीती किंवा तेढ निर्माण होऊ शकते
गोपनीयतेचा अभाव,वैयक्तिक माहिती लीक होणे, हॅकिंग किंवा सायबर बुलिंग चा धोका वाढतो
स्क्रीन टाईम वाढल्यामुळे शारीरिक हालचाली कमी होतात आणि शारीरिक समस्या (उदा. डोळ्यांचे विकार, पाठदुखी)
सामाजिक दुरावा : व्हर्च्युअल जगात गुंतल्यामुळे घरातील आणि मित्रपरिवारातील प्रत्यक्ष संवाद कमी होतो थोडक्यात, सोशल मीडियाचा मर्यादित आणि योग्य वापर करणेच हितावह आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रूप च्या अध्यक्षा किरण अंबुस्कर, लता हरकुट, राखी काबरा जया जैन, सविता पाटील, मालती कायंदे, शशी भाला, ज्योती आगेवाल, तरुणा भारूका, सुनीता शिंदे यांनी परिश्रम घेतले



