असंख्य लोकांना नेत्र रुग्णांना अखेर दूरदृष्टी मिळाली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर,महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर, समता फाउंडेशन मुंबई तसेच उपजिल्हा रुग्णालय ब्रह्मपुरी यांचे संयुक्त विद्यमाने वैद्यकीय अधीक्षक डॉ. खंडाळे सर यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 13 /10 /2025 सोमवार ला उपजिल्हा रुग्णालय ब्रह्मपुरी येथे नेत्र शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात एकूण 275 नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 69 मोतीबिंदू रुग्णांची नेत्र शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. यापैकी एकूण 52 मोतीबिंदू रुग्ण महात्मे नेत्र रुग्णालय नागपूर येथे पाठविण्यात आले. तसेच एकूण 17 मोतीबिंदू रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे नेत्र शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले.
या शिबिरात सर्व नेत्र रुग्णांची तपासणी नेत्र चिकित्सा अधिकारी वाय. आर.रामटेके यांनी केली. नेत्र शस्त्रक्रिया पूर्व तपासणी (physician fitness) उपजिल्हा रुग्णालय ब्रह्मपुरी येथील फिजिशियन डॉ.किशोर जिवने सर व डॉ. ओमप्रकाश ढोंगे सर यांनी केली. यावेळी समता फाउंडेशन चे आरोग्य अधिकारी श्री आकाश निकुरे सर प्रामुख्याने उपस्थित होते.