पोलीसचे वतीने सायबर जनजागृती अभियान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात वर्धा जिल्हातील नागरीकांना सायबर साक्षर करणे करीता वर्धा जिल्हा पोलीसचे वतीने सायबर साक्षरता अभियान राबवत आहे.
सदर सायबर साक्षरता अभियानांतर्गत वर्धा जिल्हयातील विविध शाळा व कॉलेज तसेच वर्धा जिल्हातील कंपन्यामध्ये जाऊन विद्यार्थी, शिक्षकांना तसेच अधिकारी व कर्मचारी यांना सायबर गुन्हयांबाबत माहिती देवुन तसेच सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात सायवर गुन्हांपासून कसे वाचावे याबाबत माहीती देवुन सायवर जनजागृती करण्यात येते.
सध्या संपुर्ण भारतात Implementation of Cyber Awareness Programme-October २०२५ सायवर जणजागृती सप्ताह सुरु आहे. सायबर शाखा, वर्धा तर्फे शहरात तसेच ग्रामिण भागातील शाळा, महाविद्यालय तसेच सार्वजणीक ठिकाणी सायवर शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांचे मार्फत सायवर क्राईम संदर्भात जणजागृती करण्यात येते. सायबर क्राईम जणजागृती अंतर्गत विद्यार्थी व नागरीकांना इंस्टेंट लोन फॉड, डिजीटल अरेस्ट, APK फाईल फॉड, ओटीपी, बँकॉक फॉड, सेक्सटॉर्शन फाँड, टास्क फ्रॉड तसेच शोसल मिडीया वापराबाबत व महिला बाबत गुन्हयाची माहिती देण्यात येते. तसेच वृत्तपत्र, बॅनर व माहितीपत्रकद्वारे जणजागृती करण्यात येत आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक व इतर सोशल मिडीयाद्वारे नागरीकांना सायबर विषयी माहिती पुरविण्यात येते.
सायबर सेल तर्फे आव्हान व्हॉट्सअॅपद्वारे आलेल्या मॅसेजमध्ये APK फाईल अथवा लिंकवर क्लिक करु नका. समाजमाध्यमांवर येणाऱ्या अनोळखी फ्रेंड रीक्वेस्ट स्विकारु नका. ओटीपी शेअर करु नका. मोबाईलद्वारे अनोळख्या बँकेकडून अथवा संस्थेकडुन मिळणारे छोटे लोन घेवु नका. अनोळखी इसमांचे व्हिडीओ कॉल स्विकारु नका. व्हॉट्सअॅपद्वारे मिळालेले वर्क फ्रॉम होम स्विकारु नका. टेलीग्राम किंवा व्हॉट्सअॅपद्वारे आलेल्या मॅसेजवरुन इनवेस्टमेंट करु नका.
सायबर फसवणूक झाल्यास १९३० किंवा १९४५ क्रमांकवर संपर्क करा किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळाचा आपली तक्रार नोंदवा.