सरन्यायाधिश यांचेवर झालेल्या भ्याड हल्ला विरोधात सावली शहरात निषेध मोर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
भारताचे सरन्यायाधिश न्यायमुर्ती भुषण गवई यांचेवर दि. 6 ऑक्टोंबर रोजी सर्वाच्च न्यायालयात झालेल्या भ्याड हल्याविरोधात सावली तालुका क्रांती मोर्चा च्या वतीने सावली शहरात तालुक्यातील संविधान प्रेमीचा मोर्चा (दि. 14) रोजी काढण्यात आला. या मोर्चात असंख्य संविधान प्रेमी उपस्थित होते.
भारताचे सरन्यायाधिश न्यायमुर्ती भुषण गवई यांचेवर सर्वोच्च न्यायालयात विक्षिप्त मनोवृत्तीच्या मुनवादी माथेफिरु वकील राकेश किशोर तिवारी यांने अपमानजनक भ्याड हल्ला केला. हा हल्ला जातीयावादी मानसिकेतुन करण्यात आलेला होता. यामुळे भारताच्या संविधानाला गालबोट लागले असुन येथील सवर्ण मनुवादी मानसिकतेच्या लोकांनी घडवून आणलेला होता. भारतीय संविधानाने प्रस्थापित व पुरस्क़त केलेल्या मानवतावादी समतेला अमान्य करण्याचे एक मोठे षडयंत्रच गेल्या काही वर्ष्ज्ञापासुन सुरु आहे.
याला छुपा पाठींबा येथील वर्णविद्वेशी सरकाचा सुध्दा आहे भारतात स्वातंत्र, समता, बंधुता व न्यायावर आधारीत संविधान लागू झाल्यानंतर भारतातल्या बहुजन समाजाची होत असलेली सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व आर्थिक प्रगती पाहुन देशातील वर्णवर्चस्वादी मानसिकता असलेली लोकं घाबरुन गेली असुन बहुजन समाजावर असे हिंसक हल्ले करुन त्यांना नाउमेट करण्याचा केवीलवाना प्रयत्न हे षडयंत्रकारी लोक करीत आहेत. त्यामुळे भारतीय संविधानाचा अवमान झाला असुन असे दुष्कृत्य थांबविण्यासाठी सावली तालुका क्रांती समितीच्या वतीने भव्य निषेध मोर्चाचे आयोजन केले होते.
या प्रसंगी विधानसभेचे प्रतिनिधी शहरात असतांना सुध्दा या मोर्चात सहभागी न झाल्याने मोर्चेकरांनी खंत व्यक्त करुन लोकप्रतिनिधीचा सुध्दा निषेध केला. सदर मोर्चाचा सावली तहसिल कार्यालयात समारोप करण्यात आला तर सावलीचे तहसिलदार यांचे मार्फत भारताचे महामहिम राष्ट्रपती यांचेकडे निवेदन सादर केले.