विदर्भ महाविद्यालय येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- विदर्भ महाविद्यालय व नवसाथी प्रा. लि. हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयामध्ये सोमवार ८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात येत आहे.
परिसरातील सुशिक्षित बेरोजगार यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याच्या दृष्टिकोनातून इयत्ता दहावी ते पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी रोजगार तसेच रोजगार मार्गदर्शनाचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी जिवती परिसरातील सर्व सुशिक्षित बेरोजगारांनी तसेच युवक व युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व सदर मेळाव्याला उपस्थित राहावे.
या रोजगार मेळाव्याचे आयोजन विदर्भ महाविद्यालय जिवती येथे नवसाथी प्रा लि. यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. अधिक माहितीसाठी कृपया डॉ. परवेज अली रोजगार अधिकारी विदर्भ महाविद्यालय जिवती यांच्याशी संपर्क करावा. संपर्क क्रमांक ९५६१२३११७१ आपल्या दारी चालून आलेल्या उचीत संधीचा लाभ परिसरातील युवकांनी घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. एस .एच. शाक्य मॅडम यांनी जनतेस केले आहे.