पोलीसांच्या अथक प्रयत्नाने वर्धा धाम नदीतील पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधुन अंतिम संस्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक ०२.०९.२०२५ चे दुपारी ०२.०० वा. सुमारास मौजा महाकाळ, येथील पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशन सावंगी मेघे, येथे फोनद्वारे माहिती दिली की, पुरूषोत्तम घुलबाजी देहारे, वय ५८ वर्ष, रा. महाकाळ, ता.जि. वर्धा हे धाम नदीचे पात्रात पुराच्या पाण्यात वाहत गेले आहे. अशी माहिती प्राप्त होताच तात्काळ वाहुन गेलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सावंगी मेघे पोलीस स्टाफ घटनास्थळी पोहचुन, पोलीस स्टाफ व स्थानिक लोकांच्या मदतीने शोध मोहीम सुरू करण्यात आली. खुप वेळ शोध घेवुनही प्रतीकुल हवामान, नदीचा वेगवान प्रवाह अणि पाण्याची पातळी वाढल्यामुळे शोध कार्यात अनेक अडचणी आल्या. दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतरही काहीच यश आले नाही.
परंतू पोलीसांनी हार मानली नाही. मा. पोलीस अधिक्षक सा. यांना संपर्क करून त्यांच्याकडून मा. जिल्हा अधिकारी सा. यांचेकडील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक यांच्या मदतीने पुन्हा सावंगी पोलीस बोटीसह नदीच्या पात्रात उतरले व शोध मोहीम सुरू केली. अखेर दि. ०४.०९.२०२५ चे ०५/४५ वा. सुमारास शोध मोहीम राबवीत असतांना मौजा महाकाळ येथील पुलापासुन अंदाजे दिड किलोमीटर अंतरावर पाण्यात वाहुन गेलेल्या पुरूषोत्तम घुलबाजी देहारे, वय ५८ वर्ष, रा. महाकाळ, ता.जि. वर्धा यांचा मृतदेह नदीच्या पात्रात आढळुन आला. पोलीसांनी मृतदेह नदीचे पात्रातुन बाहेर काढुन शवविच्छेदनासाठी, सामान्य रूग्णालय वर्धा येथे पाठविला असुन पो.स्टे. सावंगी मेघे येथे मर्ग नोंद करण्यात आलेला आहे. तसेच मृतकाचे प्रेत हे त्यांचे नातेवाईक यांचे ताब्यात अंतीमविधी करिता देण्यात आले आहे. पुढील चौकशी सुरू आहे.
सदरची कामगीरी मा. श्री. अनुराग जैन, पोलीस अधीक्षक, जि. वर्धा, मा. श्री. सदाशीव वाघमारे, अति. पोलीस अधिक्षक, जि. वर्धा, मा. श्री. प्रमोद मकेश्वर, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग वर्धा यांचे मार्गदर्शनात सपोनी. पंकज वाघोडे ठाणेदार पो.स्टे. सावंगी जि. वर्धा, पो.उपनि. गोपाल शिंदे, ना.पो.शि. संजय ब.नं. १४९५, पोहवा. निलेश, ब.नं. १२८५, चापोहवा. वैरागडे/७१०, पोहवा. भगत/११३४ व आपत्ती व्यवस्थापन पथकातील अंमलदार पोहवा शिवकुमार / ६३८, पो.शि. संग्राम ९७९ पो.शि. वैभव/९८०, पो. शि. अक्षय/७९३, पो.शि. पंकज ९३९, पो.शि. बाळकृष्ण/१७१, पो.शि. अमित / ३८८ यांनी केली आहे.