ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

व्यसनाधीनतेमुळे वेकोली कर्मचाऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

     शहरातील गणपती वार्ड येथे राहणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी दारूच्या व्यसनाधीनतेमुळे घरीच छताला दोराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक ४ रोज गुरुवारला उघडकीस आली.

धम्मचक्र भगवान ठमके वय ३९ वर्ष राहणार गणपती वार्ड गवराळा असे आत्महत्या करणाऱ्या वेकोली कर्मचाऱ्यांचे नाव आहे. धम्मचक्र हा परिवारासह राहत होता. तो दारुच्या आहारी गेल्याने व्यवस्थित कामावर सुद्धा जात नव्हता यामुळे तो त्रस्त होता. त्याने घरी छताला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली ही बाब पत्नीला माहिती होताच पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये