ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणेशोत्सवाच्या आनंदातही रुग्णांसाठी धावून आले आ. सुधीर मुनगंटीवार

मुल उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयींची घेतली दखल

चांदा ब्लास्ट

शल्य चिकित्सकांना पाहणी करण्यासाठी तातडीने पाठवले रुग्णालयात

पाहणी अहवाल सादर करून रुग्णांची गैरसोय टाळण्याचे दिले स्पष्ट निर्देश

चंद्रपूर – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यतत्परतेचे आणखी एक उदाहरण नागरिकांनी बघितले. सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सगळे व्यस्त आहेत. स्वतः आमदार श्री. मुनगंटीवार देखील विविध मंडळांना भेटी देऊन श्रीगणेशाचे दर्शन घेत आहेत. पण या आनंदात आणि उत्सवाच्या वातावरणातही त्यांनी रुग्णांच्या गैरसोयीची तातडीने दखल घेतली. मुल उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयीच्या तक्रारी प्राप्त होताच वैद्यकीय अधिकाऱ्यांना सगळी कामे सोडून पहिले प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर शल्य चिकित्सकांनी रुग्णालयात पोहोचून पाहणी केली व वैद्यकीय अधिकाऱ्यांना महत्त्वाचे निर्देश दिले.

आमदार श्री. मुनगंटीवार यांनी जनसेवा हिच ईश्वरसेवा मानली आहे. त्यामुळे कुठल्याही कामांच्या, कार्यक्रमांच्या आधी जनहिताच्या कामांना ते प्राधान्य देत असतात. अशाच पद्धतीने त्यांच्याकडे मुल उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या या तक्रारींची दखल घेत त्यांनी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शल्य चिकित्सकांना पत्र लिहून कार्यवाहीचे निर्देश दिले.

मुल उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांनी विविध तक्रारी आ. श्री. मुनगंटीवार यांच्याकडे दिल्या होत्या. जिल्हा शल्य चिकित्सकांना पत्र लिहून आ. श्री. मुनगंटीवार यांनी लक्ष घालण्यास सांगितले. ‘मुल उपजिल्हा रुग्णालयामध्ये विविध आजारांवरील उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी माझ्या जनसंपर्क कार्यालयात प्राप्त झालेल्या आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांची/कर्मचार्‍यांची अनुपस्थिती, रुग्णांशी असभ्य वर्तन, योग्य प्रकारे विचारपूस न करणे, औषधोपचाराचा तुटवडा तसेच नियमित आणि कंत्राटी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने रुग्णांना होणारी गैरसोय या सर्व बाबींवर योग्य कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

यासंदर्भात स्वतः उपजिल्हा रूग्णालय मुल येथे जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी व वरील तक्रारींची पुनरावृत्ती होणार नाही याची गांभीर्याने दखल घ्यावी, असेही आ. श्री. मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले. त्यानंतर शल्य चिकित्सकांनी पाहणी करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णांची गैरसोय टाळण्याचे निर्देश दिले. यावेळी मुल येथील भाजपचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.भाजप शहराध्यक्ष प्रवीण मोहूर्ले, माजी उपाध्यक्ष नंदू रणदिवे, माजी सभापती मिलींद खोब्रागडे, प्रशांत बोबोटे, सुनील कुकुटकर, संतोष गाजुलवार, राकेश ठाकरे, सूर्यकांत सहारे आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये