प्रोजेक्ट अरुणोदय हे नगर परिषदेने स्वयंस्फुर्तीने सुरु केलेले दीर्घकालीन नियोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे
बल्लारपूर नगर परिषदेच्या अंतर्गत मराठी, हिंदी, उर्दू व तेलुगु माध्यमाच्या एकूण 13 प्राथमिक व माध्यमक शाळा आहेत. या शाळांत सुमारे 1150 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दिनांक 27 डिसेंबर 2024 ला प्रोजेक्ट अरुणोदय हे नगर परिषदेने आपल्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण सर्वांगीण विकासासाठी स्वयंस्फुर्तीने सुरु केलेला अभिनव उपक्रम लांच करण्यात आला. त्यात मुख्यतः दोन घटक आहेत, पहिला घटक म्हणजे नगर परिषदेकडून शाळांना पुरवठा करावयाच्या सोयीसुविधा आणि दुसरा घटक म्हणजे शाळेतील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी सातत्याने करावयाचे प्रयत्न.
पहिल्या घटकांतर्गत नगर परिषदेने शैक्षणिक सत्र सुरु होण्यापूर्वीच नगर परिषदेच्या सर्व शाळांची डागडुजी करण्यात आलेली आहे. सर्व शाळांत मुली व मुलांची स्वतंत्र शौचालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक शाळेत RO बसविण्यात आले आहे. किरकोळ दुरुस्त्या असलेल्या ठिकाणी आवश्यकतेनुसार खिडक्या, दरवाजे, शौचालय शेड, रेलिंग, पाणी tank बसविणे इत्यादी कामे करून देण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक शाळेत पाण्यासाठी बोअरवेल खोदून देण्यात आले आहे, शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पुरवठा करण्यात आले आहे. सोबतच नोटबुक, शुज – सॉक्स, स्कूल bag चीही पुरवठा दरवर्षी नगर परिषदेकडून करण्यात येत आहे. शाळांच्या सुरक्षिततेसाठी सर्व शाळांना संरक्षित भिंत बांधण्यात आलेली आहे.
विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी शहीद भगतसिंग शाळेत कबड्डीचे, पीएमश्री साईबाबा शाळेत खो-खोचे व नगर परिषद गांधी विद्यालयात व्हॉलीबॉलचे मोठे मैदान तयार करण्यात आले आहे. शहीद भगतसिंग शाळा व विजयालक्ष्मी पंडित शाळेत लहान मुलांचे खेळण्याचे साहित्य बसविण्यात आले आहेत. प्रत्येक शाळेसाठी किचन शेड तयार करून देण्यात आले आहे, ज्या शाळांच्या फळा नादुरुस्त होत्या त्या वेळीच दुरुस्त करून देण्यात आले असून प्रत्येक शाळेला digital board व व्हाईट बोर्ड उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पीीएमश्री साईबाबा शाळा, डॉ. झाकीर हुसेन उर्दू शाळा व विजयालक्ष्मी पंडित शाळांचे water प्रूफिंग व मजबुतीकरणाचे काम करण्यात आले आहे. नगर परिषदेच्या सर्व शाळांच्या रंगरंगोटीच्या कामास व इमारत दुरुस्तीच्या कामांस तांत्रिक मान्यता प्राप्त झाली असून लवकरच प्रशासकीय मान्यता प्राप्त झाले की, पुढील कार्यवाही होईल.
सीसीटीव्हीचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहे. मान्यता प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही होईल. नगर परिषदेच्या शाळांतील शिक्षकांची उपस्थिती gps फोटोद्वारे online नोंदविली जात आहे. काहीच दिवसांत शिक्षक उपस्थितीसाठी बायोमेट्रिक मशीन उपलब्ध होणार आहेत, नगर परिषदेच्या आकृतीबंधात शिक्षकांची पदे कमी असूनही व 30 विद्याव्यांच्या मागे। शिक्षक असे प्रमाण असतानाही विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी नगर परिषदेने प्रत्येक वर्गाला एक शिक्षक उपलब्ध करून दिलेला आहे. नगर परिषदेकडून पुरविण्यात येणा-या अनेक सुविधा ह्या तात्काळ होणारी नसल्याने ती टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. त्यादृष्टीने नगर परिषदेकडून प्रयत्न करण्यात येत आहे.
सदर प्रोजेक्टचा दुसरा घटक असलेल्या शिक्षकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे व पर्यवेक्षीय यंत्रणांच्या मार्गदर्शनामुळे मागच्या वर्षाच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत सुमारे 100 ने वाढ झाली. नियमित उपस्थितीत लक्षणीय वाढ झाली आहे. शिक्षकांच्या नियमित गृहपाठ व पालक संपर्क यांमुळे पालकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. दर महिन्याला नियमित पालक सभा होऊ लागल्या. विद्यार्थी-शिक्षक-पालक यांतील सकारात्मक संवाद वाढला. मागे पडलेल्या विद्याध्यांसाठी प्रत्येक शाळेत अतिरिक्त वर्ग घेण्यात येत आहेत. प्रत्येक शाळेत आनंददायी शनिवार राबविण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांना शाळेप्रती गोडी वाढली. स्वच्छ शाळा सुंदर शाळा स्पर्धेत बल्लारपूर तालुक्यातून डॉ. बाबासाहेच आंबेडकर हिंदी शाळेने द्वितीय पारितोषिक पटकाविले. सर्व शाळांत परसबाग तयार करण्यात येत आहे. आदर्श शाळांच्या भेटी निवडणुकीच्या कामामुळे व सतत पडणा-या पावसामुळे पुढे गेले असून सप्टेंबर महिन्याच्या तिस-या आठवड्यात भेटीचे नियोजन करण्यात आले आहे. शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला शाळा प्रवेशोत्सव उपक्रम मोठ्या थाटात पार पडला. शालेय बाल क्रीडा व सांस्कृतिक संमेलन दरवर्षी उत्साहात पार पडतो.
प्रोजेक्ट अरुणोदय हा नगर परिषद बल्लारपूरने सुरु केलेला स्वयंस्फूर्त उपक्रम आहे. त्याची अंमलबजावणी योग्यरीत्या सुरु असून इयत्ता। ली ते 8 वीच्या विद्याव्यांची प्रारंभिक चाचणी पुढच्या आठवड्यात घेण्याचे नियोजन झाले आहे. त्यानंतर अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना उपचारात्मक अध्यापन करून अंतिम चाचणीद्वारे पुन्हा मूल्यमापन करण्यात येणार आहे. वर्षभरातील कामगिरीनुसार मूल्यमापन करून विद्यार्थी, शिक्षक व शाळा यांना पारितोषिके दिली जाणार आहेत.
एकंदरीत प्रोजेक्ट अरुणोदय हा बल्लारपूर नगर परिषदेच्या शाळांतील गुणवत्तापूर्ण व सर्वोगिक विकासासाठीचे एक अभिनव व दीर्घकालीन नियोजन असून त्याची खरी सुरुवात या सत्रात झालेली आहे. याचे सकारात्मक सुपरिणाम भविष्यात नक्कीच दिसतील,