भारतीय जैन संघटनेच्या वतीने शिक्षक दिनी शिक्षकांचा सन्मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
संपूर्ण भारतभर 5 सप्टेंबर या दिवशी भारताचे दुसरे राष्ट्रपती महान विचारवंत आणि भारतरत्न पुरस्कार प्राप्त डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती दिनी शिक्षक दिन म्हणून सर्वत्र साजरा होत असतो या दिनाचे औचित्य साधून भारतीय जैन संघटना पुणे च्या मुख्य कार्यालयातून ज्या ज्या ठिकाणी भारतीय जैन संघटनेच्या शाखा कार्यरत आहेत त्या त्या शाखेने त्या त्या भागातील शिक्षकांचा सन्मान करण्याचे निर्देश दिल्यावरून शहर शाखेच्या वतीने नगरपरिषद द्वारा संचलित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद मराठी प्राथमिक शाळेत संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य सन्मती जैन (पत्रकार) यांच्या पुढाकाराने तेथे कार्यरत सर्व शिक्षक वृंद यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सविता संजय पाटील यांच्या हस्ते सुद्धा शिक्षक शिक्षिका यांचा सन्मान करण्यात आला.
याबाबत सविस्तर असे की भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा, राष्ट्रीय अध्यक्ष नंदकिशोर साखला, मॅनेजिंग डायरेक्टर कोमल जैन, नॅशनल जनरल सेक्रेटरी डॉक्टर पंकज चोपडा, नॅशनल हेड फाउंडेशन प्रोग्राम चे राजेश खिवंसरा महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष केतनशहा यांचे मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतात फाउंडेशन प्रोग्राम अंतर्गत पाच सप्टेंबर 25 रोजी तीथी ग्राम (गुरदक्षिणा) हा शिक्षक दिनाचे निमित्ताने आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी भारतीय जैन संघटनेच्या शाखा आहेत त्या त्या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचे नियोजन करण्यात आले यामध्ये भारतीय संघटनेच्या वतीने मूल्यवर्धन हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करून घेतल्यानंतर या विषयाच्या तज्ञांनी व ट्रेनर यांनी शिक्षकांनी कॅम्प घेऊन त्याचा प्रचार व प्रसार केला या शृखला मध्ये जे जे शिक्षक सहभागी झाले त्या सर्वांचा सन्मान या दिवशी घेण्याचे नियोजन करण्यात आले.
देऊळगाव राजा शहरात नगर परिषद च्या वतीने चालविण्यात येत असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेतील कार्यरत शिक्षक वृंद यांचा यशोचित सन्मान करण्यात आला याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सविता पाटील यांनी सांगितले की या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला आहे त्याकाळी ते ज्या शाळेत विद्या दानाचे काम करायचे त्या शाळेतील विद्यार्थी त्यांना त्या दिवशी फुल देऊन शुभेच्छा देत व त्यांचे आशीर्वाद देत त्यांनी त्या क्षणी असे सांगितले.
की तुम्ही माझा वाढदिवस या दिवशी साजरा न करता या दिवशी तुम्ही तुमच्या सर्व गुरुजनांचा सन्मान करा त्या दिवशीपासून हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात आहे विद्येचे दान करणाऱ्या शिक्षकांचा या दिवशी सन्मान होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगून शिक्षकच हे उद्याची पिढी घडवणारे खरे शिल्पकार आहेत असे सांगितले यावेळी भारतीय जैन संघटनेचे सन्मती जैन, शाखाध्यक्ष पियुष खडकपूरकर, अंकित वाटाणे, नंदन दर्यापूरकर, प्रियदर्शन जिंतूरकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर शंकर तलबे,योगेश खांडेभराड, पारीक डेरीचे संचालक निरज पारिख, संजय पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका आरती राजमाने, अनंता सानप, मंगल गाडगे, प्रवीण गाडे, सतीश पिंगळे, प्रतिभा लोंढे, संगीता कुमटे, जी.एम. जेठे, यु.पी.वाघ, एस.आर.देवकर, रिता वाघ उपस्थित होते